स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज तिसऱ्या दिवशीही पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला असून हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. (farmers) दरम्यान, आज आंदोलनास्थळी शेतक-यांसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी गायीची पुजा करून दिवाळी साजरी केली.

आजपासून दिवाळीचा सण सुरू होत आहे. आज वसुबारस वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असून या दिवशी सवत्स गाईची म्हणजे वासरासहित गाईची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. हिंदू पंचांगानुसार, आश्विन महिन्यातील कृष्ण (वद्य) पक्षातील द्वादशी तिथीला हा सण साजरा केला जातो, ज्याला ‘गोवत्स द्वादशी’ असेही म्हणतात. आज राजू शेट्टी यांनी पुणे-बंगळूर महामार्गावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी गायीची पुजा करून शेतकऱ्यांसोबत दिवाळी रस्त्यावर साजरी केली.
ऊस दराचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावण्यासाठी आम्ही दोन पावले मागे येण्यास तयार आहोत. कारखानदारांनी उसाला पहिली उचल प्रतिटन एकरकमी ४,२०० रुपये द्यावी; अन्यथा शुक्रवारी (दि. ६) कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळण्यात येईल. (farmers) तसेच, साखर कारखानदारांच्या घरांसमोर शिमगा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी बुधवारी किणी टोल नाक्यावरील आंदोलनस्थळी दिला आहे.
किणी टोल नाक्यावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी सभा झाली. यावेळी शेट्टी यांनी ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपण दोन पावले मागे येऊ, कारखानदारांनी दोन पावले पुढे वावे आणि सामंजस्याने तोडगा काढत एकरकमी पहिली उचल ४,२०० रुपये द्यावी, अशी मागणी केली. यासाठी कारखानदारांना दोन दिवसांची मुदत दिली. यानंतर कारखानदारांच्या दारात शिमगा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
शेतकरी तीन दिवसांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना प्रशासनाकडून प्रश्न सोडविण्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याबद्दल विविध वक्त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये; अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढवून अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. (farmers) दरम्यान, मंगळवारपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा फटका वाहतुकीला बसला असून, विशेषतः सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्यांना लांबचा फेरा मारून पोहोचावे लागत आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट
दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले
निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा