कोल्हापूर माझ्याकडे का बघितलेस असा जाब विचारत राजारामपुरी सातवी गल्ली येथे दोन गटांत राडा झाला. आशुतोष उमेश भोरे (वय २२, रा. राजारामपुरी ४ थी गल्ली) जखमी झाला. (Rajarampuri) या घटनेचे पडसाद सीपीआर रुग्णालयातही उमटले, उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात गेलेले दोन्ही गट पुन्हा भिडल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. बुधवारी सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास या घटना घडल्या.

बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आशुतोष भोरे मित्रासोबत राजारामपुरी सातव्या गल्लीत चहा पित थांबला होता. या ठिकाणी स्वरूप हातलगे, अजय हातलगे, संतोष रजपूत व वैभव बुचडे (सर्व रा. टेंबलाईवाडी) हे आले होते. (Rajarampuri) यावेळी आशुतोष आणि हातलगे यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर वीट, दगड फेकण्यात आले. हातलगे टोळक्याने आशुतोषवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली.
जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये नेले असता, दोन गट भिडले. (Rajarampuri) यावेळी दोन्ही गटांचे समर्थक तरुण आमने-सामने आल्याने शाब्दिक चकमक झाल्याने जोरदार हाणामारी झाली. सीपीआर पोलिस चौकीतील पोलिसांसह, सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही समर्थकांना वेगळे केले. पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्यासह कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी राजारामपुरी, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
हेही वाचा :
देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात
सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे महेंद्र लाड उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील
वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू बेलकडे-अलिबाग मार्गावरील घटना