कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश महसूल मंत्र्यांची घोषणा

हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवश्यक आदेश दिले आहेत. (Hatkanangale) त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध सवलती आणि उपाययोजनांचा लाभ मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हातकणंगले तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. (Hatkanangale) मात्र, तांत्रिक निकषांमुळे तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार माने यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीककर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुलीस स्थगिती, कृषीपंपांच्या चालू वीजबिलात सवलत, वीजजोडणी खंडित न करणे, शालेय व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ करणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे आणि रोजगार हमी योजनेतून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अशा उपाययोजना प्रस्तावित आहेत.(Hatkanangale) तसेच पिकांच्या नुकसानीसाठी शासन निर्णयानुसार मदत देण्याची तरतूद आहे. आमदार माने यांच्या प्रयत्नांमुळे हातकणंगले तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा प्रश्न शासनदरबारी प्राधान्याने पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात

सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे महेंद्र लाड उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील

वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू बेलकडे-अलिबाग मार्गावरील घटना