कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बळीराजा आणि सामान्य माणूस ज्याची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत होता, तो अखेर जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी पण महिनाभर उशिरा आला आहे आणि आता तो तळ ठोकून बसेल असे आश्वासक वातावरण तयार झाले आहे. “अल निनो “ला चकवा देऊन तो आल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी असल्याचा अंदाज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी मे महिन्यात व्यक्त केला होता. पॅसिफिक महासागरात उष्णता कमाल पातळीवर वाढल्यामुळे आणि तेथील पर्यावरणीय बदलामुळे एल निनो सक्रिय झाला होता आणि त्यामुळेच भारताच्या प्रवेशद्वारावरच तो थबकला होता. नेहमीप्रमाणे मान्सून अगदी वेळेत केरळमध्ये दाखल झाला होता. पण अचानक हवामानात असे काही बदल झाले की केरळ मधूनच तो माघारी गेला. (common) आणि मग चिंतेचे ढग जमू लागले. पर्यावरणीय बदलामुळे यंदा मान्सून रेंगाळणार, सरासरीपेक्षा तो कमी पडणार असे अंदाज हवामान विभागाने तसेच हवामान तज्ञांनी व्यक्त केले होते, आणि घडलेही तसेच. राज्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये असे आवाहन शासकीय पातळीवर करण्यात आले होते. वास्तविक रोहिणी नक्षत्र हे पेरणी करण्यासाठी उपयुक्त मानले जात होते.
पण निसर्गचक्र बदलत गेले आणि जून महिन्यात पेरण्या केल्या जाऊ लागल्या. गेल्या वर्षी जुलै च्या प्रारंभापर्यंत राज्यात 62% पेरण्या झाल्या होत्या. यंदा त्या अवघ्या 20 टक्क्यापर्यंत झालेले आहेत. साधारणतः आतापर्यंत राज्यात 29 लाख एकर क्षेत्रात पेरण्या झालेल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी फारच कमी आहे. आता मात्र पावसाने सांगली दमदार हजेरी लावल्यामुळे पेरण्याची लगबग सुरू होईल. पण नेहमीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना बोगस खतांचा पुरवठा झालेला आहे. शेतकऱ्यांना तसा मोठा आर्थिक फटका बसला आहे. बोगस खते मिळण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. (common) दरवर्षी तो घडतोच. शासकीय यंत्रणांचे तिकडे दुर्लक्ष झाले आहे किंवा होते आहे असे म्हणता येईल. वास्तविक शेतकऱ्यांच्या माथी बोगस खते मारणाऱ्या व्यापाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. बोगस खते विकणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक केली आहे किंवा त्यांच्यावर खटला भरला आहे आणि या खटल्या त्यांना शिक्षा झाली आहे असे ऐकिवात नाही. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यां च्या डोक्यावर दुष्काळाची टांगती तलवार दिसत असतानाच जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच गेल्या दोन दिवसापासूनवरूण राजाने राज्यात सर्व दूर दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे दुष्काळाचे संकट क्षिण झाले आहे.एल निनो सक्रिय झाल्यामुळे यंदाचे पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असणार आहे हा हवामाना तज्ञांचा अंदाज खरा ठरला आहे. तथापि मान्सून जून महिन्याच्या 25 तारखेनंतर पुन्हा सक्रिय होईल हा अंदाज थोड्याफार प्रमाणात खरा ठरला आहे. जुलैमध्ये पावसाचे आगमन होईल हा अंदाजही खरा ठरला आहे.
राज्यात काही ठिकाणी पावसाच्या कोसळधारा सुरू आहेत तर काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे आधी ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबईची अजूनही तुंबई झालेली नाही पण पावसाच्या अशाच कोसळ धारा सुरू राहिल्या तर मुंबई पुन्हा तुंबई होणार आहे. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे तेथील प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी आवश्यक काम असेल तरच बाहेर पडावे अशा सूचना देण्यात आले आहेत. आतापर्यंत पावसाने चौघा जणांचे बळी घेतले आहेत. राज्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. (common) त्यामुळे पाण्या चे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्याला आतापर्यंत हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला नाही. पण पाऊस सुरू आहे. अजून कुठेही धोकादायक स्थिती निर्माण झालेली नाही. तथापि आपत्कालीन व्यवस्थापन सज्ज ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?