गोकुळ शिरगावात विजेच्या धक्क्याने तीन गाभण शेळ्यांचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव येथील महालक्ष्मी नगर, माळवाडी परिसरात महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे तीन गाभण शेळ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी यशवंत शामराव जाधव यांच्या मालकीच्या तीन गाभण शेळ्या नेहमीप्रमाणे परिसरात चरायला गेल्या होत्या. (electric shock) त्यावेळी परिसरातील महावितरणच्या एका विद्युत खांबामध्ये वीज प्रवाह उतरल्याने शेळ्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या अपघातात तिन्ही शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृत झालेल्या शेळ्या गाभण असल्याने जाधव यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेत त्यांचे सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (electric shock) अचानक घडलेल्या या घटनेमुळे जाधव कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्युत खांबामध्ये वीज प्रवाह उतरण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणने विद्युत यंत्रणेची तातडीने तपासणी करावी, (electric shock) अशी मागणी करण्यात येत आहे.दरम्यान, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप जनावरांचा बळी गेल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत आणि योग्य भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?