सांगली येथील राममंदिर चौकातील ‘द मोबाईल स्पेस’ हे मोबाईल दुकान आणि शेजारील ‘प्रियदर्शनी बेकरी’च्या छताचा पत्रा उचकटून चोरट्याने तब्बल १० लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. (mobile shop) ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित चोरट्याला ताब्यात घेतले आहे. नंदकुमार उत्तम भोसले (रा. सांगली) यांनी या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राममंदिर चौकातील परिवार बेकरीशेजारी नंदकुमार भोसले यांचे ‘द मोबाईल स्पेस’ नावाचे दुकान आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले होते. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास संशयित चोरट्याने दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील ब्रँडेड कंपन्यांचे १० लाख ५० हजार रुपये किमतीचे १७ मोबाईल आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने सीसीटीव्हीचा डीव्हिआर चोरून नेला. (mobile shop) त्यानंतर चोरट्याने शेजारील प्रियदर्शनी बेकरीच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश करत रोख रक्कम, तूप आणि शीतपेये असा ६ हजारांचा मुद्देमाल लांबवला. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास कामगार दुकान उघडण्यासाठी आले असता हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताला सांगलीतून ताब्यात घेतले. (mobile shop) त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होती.चोरट्याने अत्यंत चपळाईने काही मिनिटांतच मोबाईल आणि डीव्हिआर पळवला. बेकरीत चोरी करताना त्याने तेथील सीसीटीव्ही कॅमेरा भलतीकडे वळवला, तसेच बेकरीतच बसून शीतपेय प्यायल्याचे फुटेज समोर आले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
हेही वाचा :
पंकजा मुंडेंना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर राजकारणात खळबळ?
व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र?