मिरज-दिल्ली किसान रेल सेवेला रेल्वे प्रशासनाची मान्यता?

सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि विजयपूर जिल्ह्यांतील फळे, भाजीपाला, फुले व इतर नाशवंत कृषी उत्पादनांना देशातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत जलद व सुलभ वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मिरज-दिल्ली किसान रेल सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावास रेल्वे प्रशासनाने अखेर मान्यता दिली आहे. ही बाब दक्षिण महाराष्ट्रातील शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी अत्यंत दिलासादायक (Railway) आणि आशादायी ठरणार आहे. आता जिल्हाधिकारी, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या थेट समन्वयातून या किसान रेल्वेचे पुढील नियोजन करण्यात येणार असून, यामुळे बाजारपेठ ते शेतकरी असा थेट व्यवहार होणार आहे.

अशोक काकडे हे सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतमालाला राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे, (Railway) वाहतूक खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने किसान रेल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रक्रियेत कृषी विभाग, रेल्वे प्रशासन, शेतकरी उत्पादक कंपन्या, व्यापारी संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांच्याशी अनेक बैठका घेऊन समन्वय साधण्यात आला होता.

विशेषतः, ही सेवा मिरज येथूनच सुरू व्हावी, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने ठामपणे मांडली होती. यामागील उद्देश केवळ रेल्वे सेवा सुरू करणे एवढाच नसून मिरज–सांगली परिसरात नवीन कृषी-लॉजिस्टिक आणि आर्थिक विकास केंद्र निर्माण करणे हा होता. (Railway) यामुळे भविष्यात वित्तीय संस्थांच्या सहकार्याने शीतगृहे, पॅक हाऊसेस, वेअरहाऊसिंग, प्रक्रिया उद्योग, वाहतूक व रोजगाराच्या नव्या संधी या परिसरात विकसित होण्याची मोठी क्षमता निर्माण झाली आहे. किसान रेल सुरू झाल्यानंतर द्राक्षे, डाळिंब, केळी, भाजीपाला, फुले, दुग्धजन्य पदार्थ व इतर कृषी उत्पादनांना दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत अत्यंत कमी वेळेत पोहोचविणे शक्य होणार आहे. यामुळे मालाची वाहतुकीतील नासाडी कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?