बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रौनक इंद्रजित आडगुळे (वय १७, रा. सोन्या मारुती चौक) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. (residence) आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास रौनकचे आजोबा दुसऱ्या मजल्यावरील किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेले असता त्यांना रौनकने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने आपल्या मुलगा आणि सुनेला याची माहिती दिली. कुटुंबीयांनी रौनकला त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.(residence) यानंतर मृतदेह शेंडा पार्क येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून रौनकचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे रौनक दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपला मोबाईल वडिलांकडे देत असे. मंगळवारी रात्रीही त्याने नेहमीप्रमाणे मोबाईल वडिलांकडे दिला होता.कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वीच्या दिवशी रौनकने आजोबांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना औषधे आणि ओआरएस दिले होते. तसेच रात्री त्यांच्याच खोलीत थांबण्याबाबतही त्याने आजोबांशी संवाद साधला होता. (residence) त्यामुळे त्याच्या या टोकाच्या निर्णयामागील कारणाबाबत कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्का बसला आहे.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?