भाजपविरोधात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दंड थोपाटले आहेत. (Rahul Gandhi) गेल्या काही दिवसांपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन गदारोळाने भरून गेले आहे. पण भाजपमधील हा नेता राहुल गांधी यांना आवडतो. कोण आहे हा नेता?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना एक मिष्कील प्रश्न विचारण्यात आला. त्यांना भाजपचा कोणता नेता सर्वाधिक आवडतो? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्याचे उत्तरही त्यांनी दिले. इन्स्टाग्रामवर एका युझरने काँग्रेस नेत्याला हा प्रश्न विचारला. त्यांचा आवडता राजकीय नेता कोण आहे? भाजपमधील कोणता नेता आवडतो? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. अनेकांना ते कोणाचे नाव घेतात याची उत्सुकता होती. उत्तराचा व्हिडिओ सुद्धा राहुल गांधी यांनी शेअर केला आहे.
राहुल गांधी यांनी उत्तर दिले आहे. त्यानुसार, कॅप्टन अमरिंदर सिंह हे त्यांचे आवडते नेते आहेत. त्यांच्यासोबत आपण अनेक वर्ष काम केले. ते अत्यंत शांत, कूल आहेत. त्यांचा लष्करासंबंधीही दांडगा अनुभव आहे. (Rahul Gandhi) त्यामुळे मी त्यांना पसंत करतो. ते माझे आवडते नेते आहेत. या व्हिडिओच्या शेवटी ते एक हास्य करत म्हणतात की, हॅलो अंकल अमरिंदर… कॅप्टन अमरिंदर सिंह हे दोनदा पंजाबचे मुख्यमंत्री होते. ते अगोदर काँग्रेस पक्षात होते. आता ते भारतीय जनता पक्षासोबत आहेत.
अमरिंदर सिंह यांनी 2021 मध्ये काँग्रेस पक्ष सोडला होता. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी 27 ऑक्टोबर 2021 रोजी नवीन पक्ष पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर 19 सप्टेंबर 2022 रोजी त्यांनी हा पक्ष भाजपमध्ये विलीन केला. ते अधिकृतपणे भाजपमध्ये दाखल झाले. पुढील वर्षी पंजाब विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी नेमके आताच त्यांचे आवडते नेते म्हणून उल्लेख करणे हा मोठा राजकीय संकेत मानल्या जात आहे.
राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर Ask Me Anything असे सत्र सुरू केले होते. त्यांनी यामध्ये विद्यार्थी आणि Gen-Z शी संवाद साधला. अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले. ते या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. त्यांना पाळीव प्राण्याविषयी विचारण्यात आले. मुक्या जीवांना सन्मानाने राहण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी यावेळी सोनिया गांधी यांचा कुत्राही यावेळी दाखवला. तुम्ही बॅटमॅन आहात का? असा प्रश्न राहुल गांधी यांना एका युझरने विचारला. त्यावर मी आणि बॅटमन अद्याप एकत्र दिसलेलो नाही असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले.
राहुल गांधी हे सातत्याने सरकारला घेरताना दिसत आहेत. पावसाळी अधिवेशनात त्यांनी CJP आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यावरून संसदेत सरकारची कोंडी केल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलताना त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला कोणी केला. (Rahul Gandhi) त्याचे आदेश कोणी दिले याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहाला देण्याची मागणी लावून धरली आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची संसदेत येण्याची हिम्मत नसल्याची टीकाही त्यांनी केली. पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक दिसले आहेत. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांची भेट घेत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
हेही वाचा :
इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?