कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
एखादा महत्त्वकांक्षी प्रकल्प राबवायचा असेल तर शासनाकडून एखाद्या तज्ञ सल्लागाराची नियुक्ती केली जाते. तथापि एखादा राजकीय पक्ष कसा चालवायचा? पक्षांतर्गत पदाधिकारी कसे नेमायचे? कोणाला नियुक्त करायचे? याचा निर्णय घेण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून राजकीय सल्लागार नेमले जाऊ लागले आहेत. (political) सध्या अशाच एका सल्लागाराशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी तब्बल सहा तास चर्चा केली आहे आणि त्याच्याबद्दल पक्षांतर्गत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

प्रशांत किशोर यांना राजकीय रणनीती तज्ञ समजले जाते. अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुखांना त्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सल्ले दिले आहेत. (political)) त्यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाते. इतर राजकीय पक्षांनी निवडणूक लढवताना कोणती रणनीती आखायची याचा सल्ला देणारे प्रशांत किशोर अर्थात पी.के. यांनी स्वतःच त्यांनी स्थापन केलेल्या जन सुरज पक्षाच्यावतीने विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. म्हणजे त्यांची स्वतःचीच स्ट्रॅटेजी चुकली असे म्हणता येईल. बिहार मधील पाटणा शहराच्या एका विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक त्यांनी लढवली आणि ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून विधानसभेवर निवडून गेले.
भारतीय जनता पक्षासाठी हा पराभव धक्कादायक होता. जंतर मंतर वरील सी जे पी च्या विद्यार्थी आंदोलनाशी हा पराभव राजकीय विश्लेषकांच्याकडून जोडला जात आहे. विद्यार्थी आंदोलनाचा पोटनिवडणुकीवर प्रभाव होता की नाही हा संशोधनाचा भाग आहे. पराभवाची नेमकी कारणे बाहेर आल्यानंतर त्याची सामान्य जनतेला माहिती मिळेल. प्रशांत किशोर यांच्या कपड्यावरील विजयाचा गुलाल अजूनही गेलेला नसताना त्यांनी मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली. तब्बल सहा तास ही चर्चा झाल्यामुळे भाजप सह अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव केला असल्यामुळे त्यांच्याशी सुनेत्रा पवार यांनी केलेली चर्चा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना नाराज करणारी आहे. अर्थात ही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अंतर्गत बाब आहे. त्याला उघडपणे विरोध करता येत नाही, पण आम्ही नाराज आहोत असा एक अप्रत्यक्ष संदेश सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे हे मात्र निश्चित. सी जे पी ने जंतर-मंतरवर आंदोलन करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास शासनाला भाग पाडले. हा राजीनामा म्हणजे सीजेपीचा मोठा विजय आहे असे समजले जाते. आणि या सीजेपीचा प्रमुख अभिजीत दिपके हा छत्रपती संभाजी नगर मध्ये आल्यानंतर त्याच्या निवासस्थानी महायुती मधील एक मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे संजय शिरसाठ हे गेले आणि त्यांनी अभिजीत चे अभिनंदन केले.
त्यानंतर नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले बच्चू कडू यांनीही दिपके याची सदिच्छा भेट घेतली. याबद्दल भाजपच्या नेत्यांनी नाराजी बोलून दाखवली होती. एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू आणि शिरसाट या दोघांनाही झापले होते. या एकूण पार्श्वभूमीवर भाजपचे कट्टर विरोधक असलेले प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यांच्याशी तब्बल सहा तास चर्चा केली. हे सुद्धा भाजपला आवडलेले नाही. आणि ते स्वाभाविकही आहे पण त्याचबरोबर प्रशांत किशोर यांची भेट घेणे हा त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे हेही तितकेच खरे आहे.
सुनेत्रा पवार यांनी प्रशांत किशोर यांच्याकडे राजकीय स्वरूपाचा सल्ला मागितला आहे आणि त्या अनुषंगानेच ही चर्चा झालेली दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यातील मोठा पक्ष व्हावयाचा असेल तर काही अप्रिय निर्णय त्यांना घ्यावे लागतील. विशेषतः पक्षातील महत्त्वकांक्षी नेत्यांना बाजूला करावे लागेल. सुनील तटकरे यांना प्रदेश अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे लागेल ((political)) अशा काही संघटनात्मक बाबीवर प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांना मार्गदर्शन केले असावे. विशेष म्हणजे त्यांनी प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा करताना पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना विश्वासात घेतलेले नव्हते किंबहुना या नेत्यांना त्यांनी चर्चेपासून दूर ठेवले होते. प्रशांत किशोर यांनी दिलेला सल्ला स्वीकारला तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कल्लोळ उठणार आहे. एकूण च राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रशांत किशोर हे सल्लागाराच्या भूमिकेत दिसतात.
हेही वाचा :
इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?