रस्त्यावरून खाली कोसळली बस, ७ प्रवाशांचा मृत्यू तर ११ जण जखमी?

हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून २२ प्रवाशांसह एक खासगी बस दरीत कोसळली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.(passengers) तर इतर प्रवासी जखमी झाले आहेत. बैरागढ चंबा मार्गावर देवीकोठी इथं बसवरचं नियंत्रण सुटून दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना पंडित जवाहरलाल नेहरू राजकीय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. शनिवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. शर्मा कोचची खासगी बस बैरागढहून चंबाच्या दिशेनं येत होती.(passengers) त्यावेळी चालूंज वळणावर बसचा अपघात झाला. बस उलटल्यानंतर दुसऱ्या मार्गावर पोहोचली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केलं. चंबा पोलीस अधीक्षक विजय सकलानी यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं. अपघाताचं नेमकं कारण तपासलं जात आहे.

बस उलटून घडलेल्या अपघातात ११ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. (passengers) काहींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आलं. तर ६ जणांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना चंबा इथं रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाहीय. गेल्या १५ दिवसात हिमाचल प्रदेशातली ही दुसरी दुर्घटना आहे. याआधी २४ जुलैला रस्त्यावर अचानक दरड कोसळल्यानं टाटा सुमो ढिगाऱ्याखाली अडकली होती. यात गाडीतील १३ जणांचा मृत्यू झाला होता. ही टाटा सुमो चंबा जिल्ह्यातल्या पांगी इथं निघाली होती.

हेही वाचा :

इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?

सांगली बलात्कार व लूटप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी?

 शिराळ्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा सहाजणांना चावा?