मार्च महिन्यात सुरू झालेल्या इराण-अमेरिका संघर्षामुळे मे महिन्यात सरकारने कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या मर्यादा आणत दरवाढ केली होती. मात्र, आता बाजारात कमर्शियल सिलेंडर मुबलक प्रमाणात असून, (LPG cylinders) काही ठिकाणी गॅस एजन्सीकडून चक्क 600 रुपये डिस्काउंटमध्ये कमर्शियल सिलेंडर विकले जात आहे. News18 च्या रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कमर्शियल LPG सिलेंडर हा सरकारी दरापेक्षा तब्बल 400 ते 600 रुपयांनी कमी किमतीत विकला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या उत्तर प्रदेशात 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरचा सरकारी दर सुमारे 2,946 रुपये आहे. मात्र, काही ग्राहकांना हाच सिलेंडर 2,400 ते 2,700 रुपयांमध्ये मिळत असल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे सरकारी तेल कंपन्यांकडून LPG दराबाबत सध्या कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. (LPG cylinders) मात्र, कुशीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये कमर्शियल LPG सिलेंडरची मागणी तुलनेने कमी असल्यामुळे काही एजन्सीकडे सिलेंडरचा अतिरिक्त स्टॉक जमा झाला आहे.
19 किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅटरिंग व्यवसायांमध्ये केला जातो. छोट्या बाजारपेठांमध्ये या व्यवसायांकडून मागणी कमी राहिल्याने काही डीलर्सकडे स्टॉक शिल्लक राहिला. हा स्टॉक लवकर विकण्यासाठी काही एजन्सी ग्राहकांना डिस्काउंट देत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घरगुती 14.2 किलोच्या LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याचे दर स्थिर आहेत. दिल्लीपासून ते मुंबई-पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये दर स्थिर आहे. (LPG cylinders) याशिवाय, आज 19 किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरच्या अधिकृत किमतीतही बदल झालेला नाही.
हेही वाचा :
दिशा सालियान हिच्या वडिलांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंकडे इशारा करत म्हटले?
विसर्जनापूर्वी गणरायाच्या कानात म्हणा, सर्व इच्छा होतील पूर्ण?