जरांगे विरुद्ध हाके संघर्ष पुन्हा पेटला एका कारणामुळे राजकारणात खळबळ?

महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (politics) यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्ष करणारे लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगेंच्या भूमिकेला उत्तर देण्यासाठी सोलापूरमध्ये येणार असल्याचे हाके यांनी जाहीर केले आहे.

मनोज जरांगे यांच्याकडून मंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि ओबीसी समाजातील नेत्यांवर टीका केली जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. काही ओबीसी नेत्यांच्या शारीरिक व्यंगावरूनही त्यांची खिल्ली उडवली जात असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजातील लोकांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवण्याची गरज असल्याचे हाके यांनी सांगितले. (politics) यासाठी ओबीसी समाजाची वज्रमूठ बांधण्याच्या उद्देशाने आपण सोलापुरात येत असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओद्वारे दिली.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत हाके यांनी सरकारलाही लक्ष्य केले. मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरून ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याचा जाब सरकारला विचारला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच ओबीसी समाजाचे नेते यापैकी कोणीही ठामपणे ओबीसींच्या बाजूने बोलत नसल्याचा दावा त्यांनी केला. मंत्र्यांवर आणि मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह भाषेत टीका होत असतानाही संबंधित मंत्री किंवा पक्षाचे पदाधिकारी त्याविरोधात भूमिका घेत नसल्याचेही हाके यांनी नमूद केले.

ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती-जमातींमधील नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी मनोज जरांगे महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असल्याचा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. तसेच मनोज जरांगे हे आई-माईवरून शिवीगाळ करत असून ओबीसी समाजातील विविध नेते आणि (politics) त्यांच्या जातींबाबत अपमानास्पद वक्तव्ये करत असल्याचा दावा त्यांनी केला. काही नेत्यांच्या शारीरिक व्यंगावरूनही भाष्य केले जात असल्याचे हाके यांनी सांगितले. या सर्व प्रकाराला आता उत्तर देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

कोल्हापुरात लिंगायत समाजाचा एल्गार?

नागरिकांनो सावधान पेट्रोल भरताना झिरोसोबत दोन गोष्टी तपासा?

सर्वसामान्यांना झटका साखरेचे दर टक्क्यांनी वाढले?