शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळणार फडणवीसांची मोठी घोषणा?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने वीज आणि कर्जमाफीसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कागल येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीनंतर आता दिवसा मोफत वीज देण्याचे सरकारचे उद्दिष्ट स्पष्ट केले. (Farmers) यासोबतच कर्जाची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्याची माहितीही त्यांनी दिली.

शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतीसाठी वीज वापरण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकारने सौर कृषी वाहिनी योजनेला वेग दिला आहे. या माध्यमातून सध्या राज्यातील 74 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावर्षीच्या अखेरपर्यंत हे प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत नेण्याचे नियोजन असून, पुढील वर्षात राज्यातील 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. (Farmers) त्यामुळे शेतीच्या कामासाठी रात्री वीजेची वाट पाहण्याची अडचण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करत राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केली असून, त्याचा 56 हजार शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची थकबाकी शिल्लक नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवण्यासाठी सरकार दरवर्षी 25 हजार कोटी रुपये खर्च करत असून, 58 हजार कोटी रुपयांची थकबाकीही शासनाने भरली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

शेतकरी आणि साखर उद्योगाच्या दृष्टीने इथेनॉल धोरणाचे महत्त्वही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. इथेनॉलचा आधार नसल्यास साखर कारखानदारी टिकवणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होते, (Farmers) अशा चर्चा सोशल मीडियावर होत असल्या तरी पेट्रोलियम कंपन्या किंवा वाहन निर्मात्यांकडे त्यासंदर्भात कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नसल्याचे त्यांनी नमूद केले. इथेनॉल धोरणामुळे साखर उद्योगाला स्थैर्य मिळाले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देणे शक्य झाल्याचेही त्यांनी सांगितले. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीचे नवे उच्चांक नोंदवले गेले असून त्याचा सकारात्मक परिणाम शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरात लिंगायत समाजाचा एल्गार?

नागरिकांनो सावधान पेट्रोल भरताना झिरोसोबत दोन गोष्टी तपासा?

सर्वसामान्यांना झटका साखरेचे दर टक्क्यांनी वाढले?