कोल्हापूर साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे आहे. इथेनॉलशिवाय साखर कारखानदारी टिकवणे अवघड आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.कागल नगरपरिषदेच्या वतीने हिंदूराव घाटगे विद्यालयाच्या जीर्णोद्धार कामाचा लोकार्पण सोहळा तसेच लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. (sugarcane) अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार होत्या. मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार, कागल तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी फडणवीस म्हणाले. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चा समाज माध्यमात होत असल्या तरी त्याबाबत पेट्रोलियम किंवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. इथेनॉल धोरणामुळे साखर कारखानदारी टिकून राहिली असून, ऊस उत्पादकांना देयके (एफआरपी) देणे शक्य झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीचे नवे उच्चांक गाठले गेले असून, (sugarcane) त्याचा लाभ ग्रामीण अर्थव्यवस्थेला, शेतकऱ्यांना झाला आहे.साखर कारखानदारी अधिक सक्षम करण्यासाठी शून्य कचरा संकल्पनेतून स्पेंट वॉश आणि मळीपासून सीबीजी व सीएनजी निर्मिती करण्यात येणार आहे. या उपउत्पादनातून मिळणारा अतिरिक्त निधी कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासह शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली आहे..सध्या ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. (sugarcane) यावर्षाअखेर ९० टक्के आणि पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना ती उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी शिक्षण आणि रोजगाराची दारे खुली केली. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या क्रांतिकारी पर्वाच्या स्मरणदिनी अशा थोर समाजसुधारकाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मिळणे ही आपल्यासाठी विशेष बाब आहे. राजर्षी शाहू महाराजांनी चुकीची सामाजिक व्यवस्था झुगारून नवी सामाजिक व्यवस्था निर्माण करताना आरक्षणासारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य संपूर्ण देशाला मार्गदर्शक आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरात लिंगायत समाजाचा एल्गार?