मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला इथे शून्य प्रतिसाद मिळतो?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

महापालिका हद्दीपासून दहा किलोमीटरच्या परिघात असणाऱ्या 40 पेक्षा अधिक गावातील लोक शासकीय तसेच तत्सम कार्यालयातील कामानिमित्ताने रोज कोल्हापूर शहरात येत असतात. (municipal) सकाळी लवकर येऊन सायंकाळी गावाकडे परतणाऱ्या लोकांची रोजची संख्या किमान एक लाखाच्या आसपास आहे. हे लोक कोल्हापूर महापालिकेच्या पायाभूत सुविधांचा लाभ घेतात.

मात्र कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीत आपली गावे येता कामा नयेत अशीच त्यांची भूमिका असते. त्यांच्या या भूमिकेला काही लोकप्रतिनिधींचे समर्थन आहे आणि ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनाला शून्य प्रतिसाद देतात. (municipal) त्याची प्रचिती रविवारी पुन्हा एकदा करवीर वासियांना आली.गेल्या 40 वर्षांपासून कोल्हापूर शहराची हद्द वाढ व्हावी अशी सर्वसामान्य जनतेकडून आणि कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाकडून मागणी होते आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीत आसपास 42 गावे समाविष्ट केली पाहिजेत अशी सुरुवात ची मागणी होती. आता ती 18 गावांवर येऊन ठेपली आहे पण काही आमदारांनी पुढाकार घेऊन अद्दवाढ विरोधी कृती समिती स्थापन केली आहे आणि या समितीकडून शहर हद्द वाढीला टोकाचा विरोध होताना दिसतो आहे.

अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री असताना कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. कोणत्याही शहराचा विकास हा त्या शहराची हद्द वाढ झाल्याच्या होत नाही, आणि म्हणूनच कोल्हापूर शहराची हद्द वाढ झाली पाहिजे असे वक्तव्य त्यांनी केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यापूर्वी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात प्रकट मुलाखत देताना सांगितले होते की, कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीचा प्रस्ताव सर्वसंमतीने माझ्याकडे आला तर केवळ दहाव्या मिनिटात हद्द वाढीची मी घोषणा करेन. ज्यांचा या हद्द वाढीला विरोध आहे त्या सर्व मंडळींनी मुंबईत येऊन माझ्याशी एकदा सविस्तर चर्चा करावी. मी त्यांची समजूत काढून आणि हद्द वाढीचा विषय निकालात निघेल अशी स्पष्ट भूमिका त्यानी मांडली होती.

रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. अनेक विकास कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षिरसागर यांनी कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक, करवीरचे आमदार चंद्रदीप नरके या दोघांनी हद्द वाढीला विरोध करणारी भूमिका सोडून द्यावी. हद्द वाढीला मान्यता द्यावी अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साक्षी ठेवून मागणी केली. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हद्द वाढीच्या बाजूने आहेत. (municipal) त्यांनीही हद्द वाढीला विरोध असता कामा नये असे मत व्यक्त केले आहे. अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, तसेच हसन मुश्रीफ यांच्या आवाहनाला या लोकप्रतिनिधींकडून 0 प्रतिसाद मिळतो आहे.

वास्तविक अमल महाडिक हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, चंद्रदीप नरके हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत, या दोघांच्या विरोधामुळे हद्द वाढ विषय प्रलंबित पडला आहे. वास्तविक या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या या आमदारांना समजावून सांगितले पाहिजे. हद्द वाढीच्या विषयांला त्यांनी मान्यता दिली पाहिजे असा आग्रह किंबहुना आदेश दिला तर हा गेल्या 40 वर्षांपासून भिजत पडलेला प्रश्न सुटू शकतो. हे दोन्ही नेते त्यांच्या आमदारांना कठोर शब्दात सांगू शकत नसतील तर हे दोन्ही आमदार त्यांचे ऐकू शकत नाहीत, आवाहनाला शून्य प्रतिसाद देतात असा एक संदेश कोल्हापूरच्या जनतेपर्यंत जाऊ शकतो. तसेच कोल्हापूरची हद्द वाढ झाली पाहिजे हे त्यांचे मत व्यक्तिगत असल्याचे स्पष्ट होते. म्हणजेच या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गंभीरता पूर्वक सकारात्मक नाहीत असाही त्याचा अर्थ निघू शकतो. या दोघांनीही ठरवले तर कोल्हापूरचे हे लोकप्रतिनिधी विरोधाच्या भूमिकेपासून दूर जातील आणि कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीचा विषय मार्गी लागेल.

विशेष म्हणजे राज्य शासनाने सहा गावे शहराच्या हद्दीत आणण्याची अधिसूचना काढून प्रक्रिया सुरू केली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश नगर विकास मंत्रालयाने दिले होते मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही आणि आता तर कोल्हापूर महापालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली आहे. त्यामुळे या सहा गावांचा प्रश्न असाच प्रलंबित पडला आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरात लिंगायत समाजाचा एल्गार?

नागरिकांनो सावधान पेट्रोल भरताना झिरोसोबत दोन गोष्टी तपासा?

सर्वसामान्यांना झटका साखरेचे दर टक्क्यांनी वाढले?