झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. JPSC आणि JSSC परीक्षांमधील कथित अनियमितता, पेपरफुटी, गैरप्रकार आणि निवड प्रक्रियेतील भ्रष्टाचाराविरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत.(political) या आंदोलनादरम्यान बळाचा वापर करणे चुकीचे असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

झारखंडमध्ये मागील काही दिवसांपासून विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. JPSC आणि JSSC या स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार आणि पेपरफुटी होत असल्याचा आरोप करत निवड प्रक्रियेतही भ्रष्टाचार झाल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याबरोबरच या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील बळाच्या वापरावर आक्षेप घेतला. विद्यार्थ्यांना शांततेच्या मार्गाने आपले म्हणणे मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. (political) त्यांच्या मागण्या आणि समस्या समजून घेऊन त्यावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची गरज असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. झारखंड सरकारने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि त्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन समस्या सोडवावी, असे आवाहनही त्यांनी केले.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या संसदेत भाषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी दिल्लीत 20 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनातील पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, खिळे लावलेल्या काठ्यांचा वापर आणि पेलेट गनचा वापर करण्याचे आदेश नेमके कुणी दिले, याचे उत्तर गृहमंत्र्यांनी संसदेत द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, हे आदेश अमित शाह यांनी दिले असतील तर त्यांची जबाबदारी निश्चित होते आणि ते दोषी ठरतात. मात्र, जर अशा आदेशांबाबत त्यांना कोणतीही माहिती नसेल, तर ते गृहमंत्री म्हणून अक्षम ठरतात. (political) त्यामुळे दोन्ही परिस्थितींमध्ये अमित शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही आज सरकार विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईवर सभागृहात चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. अमित शाह या विषयावर संसदेत भूमिका मांडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यानंतर इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी पुन्हा सरकारला या मुद्द्यावरून लक्ष्य केले.
हेही वाचा :
कोल्हापुरात लिंगायत समाजाचा एल्गार?