रोहित शर्मा पुन्हा एकदा आपल्या खास अंदाजामुळे चर्चेत आला आहे. क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक फलंदाजी आणि मजेशीर स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहितने आता कॅमेऱ्यासमोर नवा अंदाज दाखवण्याची तयारी केली आहे. (cricket) त्याने सोशल मीडियावर आगामी शोशी संबंधित व्हिडिओ शेअर केल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, त्याच्या निवृत्तीच्या चर्चेलाही पुन्हा सुरुवात झाली आहे.

रोहित शर्मा भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज म्हणून ओळखला जातो. मैदानावरील त्याची आक्रमक शैली, विनोद करण्याची पद्धत आणि सहज संवाद साधण्याची हातोटी यामुळे त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. मागील काही काळात रोहितने आपल्या फिटनेसकडेही विशेष लक्ष दिल्याचे पाहायला मिळाले. (cricket) त्याचबरोबर क्रिकेटच्या मैदानावर युवा खेळाडूंशी संवाद साधताना आणि त्यांना खेळातील बारकावे समजावून सांगतानाही तो अनेकदा दिसला आहे. आता हाच संवाद साधण्याचा आणि मजेशीर पद्धतीने व्यक्त होण्याचा अंदाज प्रेक्षकांना एका टीव्ही शोमध्ये पाहायला मिळणार आहे.काही महिन्यांपूर्वी रोहितने चाहत्यांसोबत या नव्या प्रोजेक्टची माहिती शेअर केली होती. त्याच प्रोजेक्टशी संबंधित व्हिडिओ त्याने आता पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शोच्या निर्मात्यांना चित्रीकरण कशा पद्धतीने करावे, याबाबत रोहित स्वतः सूचना देताना दिसतो. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये “स्टेज तयार आहे. कॅमेरे तयार आहेत. लवकरच भेटू.” असा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे रोहितचा क्रिकेटच्या मैदानाबाहेरील नवा प्रवास आता प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या आगामी कार्यक्रमात रोहित आपली नेहमीची विनोदबुद्धी आणि सहज व्यक्त होण्याची शैली दाखवणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांनी त्याचा जो बेधडक आणि मजेशीर स्वभाव पाहिला आहे, तोच अंदाज आता स्क्रीनवर पाहण्याची संधी मिळणार असल्याने हा अनुभव वेगळा ठरण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया युजर्सकडूनही या कार्यक्रमाबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे. रोहितला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते कार्यक्रमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (cricket) दरम्यान, रोहितचा हा नवा शो चर्चेत येताच त्याच्या क्रिकेटमधील भवितव्याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. रोहित निवृत्तीच्या जवळ पोहोचला असल्याच्या चर्चा यापूर्वीही झाल्या आहेत. मात्र त्याने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसताना केवळ शोमध्ये काम करण्याच्या निर्णयामुळे निवृत्ती निश्चित झाली असे म्हणता येणार नाही.
हेही वाचा :
कोल्हापुरात लिंगायत समाजाचा एल्गार?