काल दिल्ली आणि आज झारखंड?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्ली येथील जंतर मंतर रोडवरहिंसक आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची पंजाब (NEET exam) तसेच झारखंड येथील परीक्षा पेपर फुटी प्रकरणाने चांगलीच पंचाईत करून टाकली आहे. विशेषतः जंतर मंतर वरील आंदोलनाचे राजकीय भांडवल करणाऱ्या राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची मोठी अडचण झाली आहे. आणि आता या संदर्भात “क्या बोलती सोशल मीडिया?”अभियान सुरू झाले आहे.

अभिजीत दिपके प्रणित सीजेपी चे आंदोलन जंतर मंतर येथे सुरू असतानाच अरविंद केजरीवाल यांच्या “आप” पक्षाची सत्ता असणाऱ्या पंजाब मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या गेलेल्या फार्मसी परीक्षेचा पेपर फुटला होता. नीट परीक्षेच्या संदर्भात जी भूमिका घेतली आहे तीच भूमिका पंजाबमध्ये का घेतली जात नाही या विचारलेल्या प्रश्नावर अभिजीत दिपके याने मौन धारण केले होते. कारण तो आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता आहे. आपल्याच नेत्याच्या विरोधात तिथे आंदोलन कसे करायचे? हा महत्त्वाचा प्रश्न सी जे पी समोर होता. या प्रश्नाचे उत्तर दिपके किंवा त्याचे इतर सहकारी देऊ शकले नव्हते. (NEET exam) याच दरम्यान झारखंड राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या गेलेल्या परीक्षेचे पेपर लीक झाले. आता तिथे विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण वातावरणात आंदोलन सुरू होते. या आंदोलनात भाग घेण्यासाठी आलेल्या नेहा बोरा हिला विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरून खाली उतरायला भाग पाडले.

आमचे आंदोलन एका व्यवस्थेच्या विरुद्ध आहे ते देशाच्या विरुद्ध नाही. त्यामुळे देश तोडण्याची भाषा करणाऱ्या व्यक्तींना इथे थारा नाही असे तेथील विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केल्यामुळे अनेकांची मोठी अडचण झाली. जंतर-मंतर वर जशा देशाच्या विरोधी घोषणा देण्यात आल्या, उमर खलिद याचे समर्थन करता आले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात, ब्राह्मणवादाच्या विरोधात घोषणा देता आल्या, तशा घोषणा झारखंडची राजधानी असलेल्या रांची मध्ये देता येतील अशी स्वप्ने पाहणाऱ्या काही मंडळींना तेथील विद्यार्थ्यांनी चांगलीच चपराक लावली आहे. शांततापूर्ण वातावरणात रांची येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलकांच्यावर तेथील पोलिसांनी बळाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्यात अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जखमी झाले. पण रांची येथे अभिजीत दिपके याची सीजेपी पोहोचली नाही.

विद्यार्थ्यांवर लाठीमार का केला जातो असा गुळमळीत प्रश्न दिपके कडून विचारला गेला. पण झारखंड येथील सत्ताधाऱ्यांचा निषेध केला नाही किंवा तेथील शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी ते सरसावले नाहीत. कारण तेथे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री आहेत आणि या सरकारला राष्ट्रीय काँग्रेस आणि जेडियू चे समर्थन आहे. सत्तेत भागीदारी आहे. आणि राष्ट्रीय काँग्रेसने जंतर मंतर रोडवरील सीजेपीच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला होता.राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले होते. आणि आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली पाहिजे ही मागणी त्यांनी लावून धरली आहे. माफी मागितल्याशिवाय संसदेच्या अधिवेशनातील कामकाजात आम्ही भाग घेणार नाही अशी भूमिका राहुल गांधी आणि त्यांच्या इंडिया आघाडीने घेतली आहे. अरविंद केजरीवाल हे सुद्धा पंजाब आणि झारखंड प्रकरणी काही बोलावयास तयार नाहीत.

नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात नवी दिल्ली येथील जंतर मंतर रोडवर विद्यार्थ्यांचे झालेले आंदोलन योग्यच होते. पण तिथे काही असामाजिक घटक आंदोलनात सहभागी होते आणि त्यांनी हे आंदोलन बदनाम केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अर्वाच्य शिवीगाळ केली गेली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करून देशातील काही विचारवंत, (NEET exam) तसेच हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार यांनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा व्यक्त केला होता. पण आता झारखंडच्या रांची या राजधानीच्या शहरात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठी हल्ला झाला त्याबद्दल ही मंडळी बोलायला तयार नाहीत. मौन बाळगून आहेत.

राहुल गांधी यांनी अतिशय मवाळ भाषा वापरून रांची येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याबद्दल टिका टिपणी केली आहे. या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे मात्र तेथील शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे म्हटलेले नाही. एकूणच त्यांची भूमिका दुटप्पी आहे.सी जे पी ने”क्या बोलती पब्लिक?”हे अभियान पुढील महिन्यापासून देशभर सुरू केले जाणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजी नगर येथून केली गेली आहे. केंद्र शासनाबद्दल लोक काय बोलतात किंवा त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे या अभियानातून जाणून घेतले जाणार आहे. या अभियानास कुणाची हरकत असण्याचे कारण नाही. पण झारखंड विद्यार्थी आंदोलनाच्या संदर्भात”क्या बोलती जेसीपी?”असा समान सर्वसामान्य जनतेतून विचारला जाऊ लागला आहे. आणि त्याचे समाधानकारक उत्तर सी. जे. पी. च्या अभिजीत दिपके, सौरभ दास, आशुतोष रांका या तिघांनी दिले पाहिजे.

हेही वाचा :

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल? सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं?

ट्रम्प टॅरिफमुळे महाराष्ट्र राज्यासमोर नवे आव्हान?

मिरज पंचायत समितीत अधिकाऱ्यांना कोंडले?