मोठी बातमी बैठक अर्धवट सोडली, सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास, चर्चांना उधाण?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीएसमोर जाण्याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांनी एकाच वाहनातून प्रवास केल्याचं पहायला मिळालं.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीएसोबत जाण्याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे नेते तसेच पक्षाचे राष्ट्रीय रसचिटणीस विनोद तावडे यांनी एकाच गाडीमधून प्रवास केल्याचं पहायला मिळालं. (political) यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. बुधवारी दिल्लीमध्ये असलेल्या महाराष्ट्र सदनमध्ये जलजीवन मिशनची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे दोन्ही नेते उपस्थित होते. त्यानंतर ते ही बैठक सुरू असतानाच बैठकीतून बाहेर पडले आणि एकाच गाडीमधून रवाना झाले, त्यामुळे आता या प्रवासाची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. (political) त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत्याचं पहायला मिळालं. दरम्यान त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदारांनी नुकतीच सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. अर्थात या भेटीपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन ही भेट महाराष्ट्रातील विविध समस्यांसंदर्भात असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं होतं.दरम्यान त्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांनी एकाच वाहनातून प्रवास केल्याचं पहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये असलेल्या महाराष्ट्र सदनमध्ये जलजीवन मिशनची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला हे दोन्ही नेते उपस्थित होते, मात्र त्यानंतर बैठक सुरू असतानाच हे दोन्ही नेते बैठकीतून बाहेर पडले आणि ते एकाच गाडीमधून रवाना झाले आहेत. (political) त्यामुळे पुन्हा एकदा आता चर्चेला उधाण आलं आहे.

हेही वाचा :

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल? सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं?

ट्रम्प टॅरिफमुळे महाराष्ट्र राज्यासमोर नवे आव्हान?

मिरज पंचायत समितीत अधिकाऱ्यांना कोंडले?