माजी उपमुख्यमंत्र्यावर धारदार शस्राने हल्ला राजकारणात खळबळ?

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. माता साहिब कौर परिसरातील गुरुद्वारात हा प्रकार घडला. सुरक्षाव्यवस्था असतानाही एका निहंगने कृपाणने बादल यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. (former) त्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून बादल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुखबीर सिंह बादल हे वैयक्तिक भेटीसाठी नांदेडच्या माता साहिब कौर भागातील गुरुद्वारात पोहोचले होते. (former) त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या सुरक्षा व्यवस्थेतून एक व्यक्ती गुरुद्वारा परिसरात शिरली आणि त्याने अचानक बादल यांच्यावर धारदार कृपाणने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गुरुद्वारा परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली. हल्ल्यानंतर सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित व्यक्तीला घटनास्थळावरून पकडले. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखबीर बादल हे नांदेडमध्ये पर्सनल व्हिजिटसाठी आले होते आणि त्यांना पूर्ण सुरक्षा पुरवण्यात आली होती. या हल्ल्यात बादल यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेदरम्यान पोलिसांनाही जखमा झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नांदेडमध्ये घडलेल्या या गंभीर घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी नांदेडच्या पोलिस अधीक्षकांकडून हल्ल्याबाबत सविस्तर माहिती घेतली. आरोपीला घटनास्थळानंतर लगेच ताब्यात घेण्यात आले असून हल्ल्यामागचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. (former) त्यामुळे पोलिसांकडून हल्लेखोराची पार्श्वभूमी आणि हल्ल्याचे कारण तपासले जात आहे. हल्ल्यानंतर सुखबीर बादल यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणेकडून बादल यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुखबीर बादल यांच्यावर यापूर्वीही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. ४ डिसेंबर २०२४ रोजी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या घटनेतही बादल हे थोडक्यात बचावले होते. आता नांदेडमध्ये पुन्हा त्यांच्यावर हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा :

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल? सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं?

ट्रम्प टॅरिफमुळे महाराष्ट्र राज्यासमोर नवे आव्हान?

मिरज पंचायत समितीत अधिकाऱ्यांना कोंडले?