पालकमंत्री पदाच्या टोपी खाली नेमकं दडलय तरी काय?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार येऊन आता जवळपास दोन वर्षे होत आहेत, पण नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्याप सुटलेला नाही. शनिवारी येत असलेल्या स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण कोणी करायचे याचा निर्णय झाला आहे. (Guardian Minister) मात्र कळीचा मुद्दा कधी संपुष्टात आणला जाणार हा या दोन जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. आणि त्याचे उत्तर सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी द्यावयाचे आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गोगावले या दोघांनीही हक्क सांगितला आहे. सुनील तटकरे यांना त्यांचे कन्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री करावयाचे आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. महायुतीमध्ये दोन पक्ष एकाच पदासाठी हट्ट धरून बसले आहेत आणि महायुती मधील मुख्य घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षासमोर हा तिढा सोडवायचा कसा असा प्रश्न आहे. महायुती मधील मंत्री भरत गोगावले यांनी आपणालाच पालकमंत्री पद मिळाले पाहिजे असा आग्रह धरला आहे. (Guardian Minister) त्यासाठी त्यांनी वर्षापूर्वी आपल्या बंगल्यामध्ये होम हवन विधी केला होता. घरात अघोरी पूजा केल्याबद्दल त्यांच्यावर तेव्हा टीकाही झाली होती. खासदार तटकरे आणि गोगावले यांच्यातील राजकीय संघर्ष अजूनही संपलेला नाही. तटकरे यांनी पालकमंत्री पदाचा आग्रह सोडलेला नाही.

आदिती तटकरे यांच्यासाठी त्यांना हे पद हवे आहे. नाशिक मध्येही पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आग्रही आहेत, पण भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांना या जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवे आहे. इथे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष आहे. नाशिक मधील खड्ड्यात गेलेल्या रस्त्याबद्दल छगन भुजबळ यांनी गिरीश महाजन यांना धारेवर धरले आहे. तुमच्या कुंभमेळा विषयी आम्हाला काही देणे घेणे नाही, आम्हाला चांगल्या पायाभूत सुविधा द्या असे खडे बोल त्यांनी सुनावले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका इसवी सन 2024 मध्ये संपन्न झाल्या. महायुतीला भरघोस यश मिळाले. पण रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद काही संपुष्टात आलेला नाही.

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन महत्त्वाचे राष्ट्रीय सण म्हणून ओळखले जातात. दिनांक 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करावयाचे असते आणि दिनांक 26 जानेवारी रोजी ध्वजवंदन करावयाचे असते या दोन्ही वेळेला पालकमंत्र्यांच्या हस्तेच ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे हे संवेदनशील कार्यक्रम केले जातात. (Guardian Minister) गेल्या दोन वर्षात गिरीश महाजन आणि भरत गोगावले यांना हा सन्मान दिला आहे. यंदाही या दोघांच्या हस्तेच दोन्ही जिल्ह्यात ध्वजारोहण होणार आहे आणि तसा मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला आहे. पण पालकमंत्री पदाचा कळीचा मुद्दा तसाच राहिला आहे. रायगडचा तिढा जवळपास संपवलेला आहे असे वातावरण असले तरी तशी घोषणा झालेली नाही. गोगावले यांच्या म्हणण्यानुसार त्यांना कुठलातरी देव नडतो आहे असे म्हणता येईल.

पालकमंत्री पदाच्या टोपीखाली नेमकं काय दडलय हे सामान्य जनतेला कळावयास मार्ग नाही. पण ज्या अर्थी हे दोन्ही नेते हाताला पेटलेले आहेत त्या अर्थी काहीतरी या पदामध्ये विशेष आहे असे अनुमान काढता येईल.पालकमंत्री हा त्या जिल्ह्याच्या सर्व खात्यांचा प्रमुख असतो. तो जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो. जिल्ह्याची आर्थिक सत्ता पालक मंत्राच्या हाती असते. याशिवाय सर्व शासकीय कार्यालयामध्ये पालकमंत्र्यांचा शब्द पाळला जातो. पालकमंत्री पदाच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्यांची शासन दरबारी प्रलंबित पडलेली कामे करता येऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या पालक मंत्र्यांच्या हातामध्ये असतात आणि म्हणूनच महत्त्वकांक्षी मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात पालक मंत्री पद हवे असते.

हेही वाचा :

माजी खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ला जाग, आता ‘एकला चलो’चा नारा?

आधी वादावादी नंतर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कामाबाबत समिती स्थापन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय?

कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारणार कधी?