आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. वनौषधी विद्यापीठ ही संस्था त्यांनी आयुर्वेद विकास आणि संशोधनासाठी स्थापन केली होती. ते युरोप आणि अमेरिकेत महर्षी आयुर्वेदाचा प्रसार करत होते. ते सामाजिक कामात आत्मियतेने सहभागी होत असतं.त्यांनी १९८३ मध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून उच्च सन्मानासह आयुर्वेदाचार्य पदवी (बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी) प्राप्त केली होती. डॉ. सुनील पाटील हे महर्षी आयुर्वेदातील अग्रगण्य वैद्यांपैकी एक होते. ते गेल्या ३० वर्षांपासून नाडीवैद्य आणि पंचकर्म तज्ञ म्हणून आरोग्यासाठीच्या या वैदिक पद्धतीचे उपचार करीत होते. (Ayurveda) त्यांचे क्लिनिक लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे सत्यवादी प्रेसजवळ आहे. ते प्रामुख्याने लिव्हर (यकृत) विकार, हिपॅटायटिस बी, आणि कर्करोगाच्या गाठींवर आयुर्वेदिक उपचार करत. दीर्घकाळ हा दवाखाना विविध क्षेत्रातील मान्यवरांचा हक्काचा एकत्र जमण्याचा, चर्चेचा एक कट्टा बनला. तो त्याच्या स्वागतशील स्वभावानं.

त्यांनी महर्षी आयुर्वेदातील नाडी, आहार आणि माता-बाल संगोपन या विषयांचा अभ्यासक्रम तयार करण्यातही सहभाग घेतला. ते विद्यार्थ्यांना पंचकर्म आणि नाडी विज्ञानाचे प्रशिक्षण देत असत. ते वनौषधी विद्यापीठ या हर्बल औषधांना प्रोत्साहन देणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.त्यांची आयुर्वेद आणि अन्य भारतीय वैद्यकीय शाखांच्या व्यावसायिकांची नोंदणी नियमन करणाऱ्या महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (एमसीआयएम) या वैद्यक परिषदेवर निवड झाली होती. या निवडीनं त्याच्या शुद्ध आयुर्वेदाचा अवलंब करणाऱ्या प्रॅक्टिसचा एका अर्थानं गौरव झाला होता.(Ayurveda) त्यांनी गैरमार्गानं नोंदणी केलेल्या वैद्यकिय व्यावसायिकांविरोधात मोहिमच उघडली होती. यात कित्येकांचे संभावित बुरखे फाटले असतील. सुनिल पाटील वैद्यकिय शिक्षणातील गुणवत्तेबाबत कमालीचे आग्रही राहिले आहेत. पाटील यांनी आपल्या धारणांशी तडजोड केली नाही. त्याची किंमतही मोजली.
सुनिल पाटील याचं राजकारणाचं आकर्षण कायमचं राहिले. किंबहूना तो त्यांच्या जीवनाचा एक भागच बनून गेला आहे. तसंही राजकारण सर्वस्पर्शी असतं आणि त्यापासून दूर राहण्याच्या कल्पनांना काही अर्थ नसतो. डॉक्टर आपल्याला राजकारणाशी काही देणंघेणं नाही असल्या मध्यमवर्गीय तुच्छतावादात कधीच रमले नाहीत. वैचरिकदृष्ट्या एक विशिष्ट भूमिका निभावत आले, तसंच निवडणूकीच्या मैदानी राजकारणात त्यांनी नशीब आजमावून पाहिलं. राजकारणात दोन द्यावेत दोन घ्यावेत याच अनुभवही त्यांनी घेतला. निवडणूकही लढवून पाहिली आणि निवडणूकीचे म्हणून हिशेब आणखी निराळेच असतात याचा अनुभव गाठीला बांधला, अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी लिहून ठेवली आहे.
सुनिल पाटील यांच्या कामातील प्रचंड वैविध्यामूळं त्यातून आलेल्या अनुभवसंपन्नतेनं हे आत्मचरित्र कोणाही डॉक्टरच्या आपली प्रॅक्टीस, त्यातील अनुभव, रुग्णांना बरे करण्यातील कौशल्य व्यक्तिगत आठवणी या पलिकडं बराच ऐवज पुढं आणते हे वडणग्याचं पोरगं या पुस्तकाच वेगळेपण ठरले. ते अगदी तरुण वयातच महर्षी आयुर्वेद या महेश योगी यांच्या संघटनेशी जोडले गेले.(Ayurveda) हा अनुभव त्यांना प्रगल्भ करणारा होता. सुनिल पाटील यांना या संघटनेसाठी नेदरलॅंडमध्ये कामाची संधी मिळाली. ते पुन्हा स्वतःच्या व्यवसायात परतले मात्र भावातीत ध्यान ही संकल्पना आणि विदेशात आयुर्वेदचा प्रसार यावर पुढं काम करीत राहिले. कोल्हापुरात कित्येकांचा डॉक्टरांमुळेच भावातीत ध्यानाशी परिचय झाला. त्यांनी नेपाळपासून सिंगापूरपर्यंत आणि मॉरिशसपासून सर्बियापर्यंत विश्व आयुर्वेद परिषदांचं आयोजन केले होते.सुनिल पाटील यांनी वर्तमानपत्रात विपुल लेखन केलं आहे. ते केवळ वैद्यकिय माहती देणारं नाही तर एखाद्या पूर्णवेळ पत्रकारासारखं ते विविध विषयांवर व्यक्त होत राहिले.काही काळ त्यांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना अद्यापनही केले होते.
हेही वाचा :
माजी खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ला जाग, आता ‘एकला चलो’चा नारा?