कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
अखेर युद्ध संपलं! पश्चिम आशियाई देशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. युद्ध बंदीचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. युद्ध बंदीच्या घोषणेनंतर अवघ्या काही तासात क्रूड तेलाच्या किमती मध्ये घसरण झाली आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेला दिलासा मिळाला आहे. पण हे युद्ध कशासाठी झाले? युद्धाचा उद्देश सफल झाला काय? या युद्धात कोण हरलं आणि कोण जिंकलं? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सध्या तरी मिळू शकणार नाहीत.

इराणकडे समृद्ध युरेनियमचा साठा आहे.त्याचा उपयोग अण्वस्त्र निर्मितीसाठी केला जातोय किंवा केला जाणार आहे. इराणकडून गुप्तपणे अण्वस्त्र निर्मितीचा उद्योग सुरू आहे. इराणने हा कार्यक्रम किंवा हा उद्योग तातडीने बंद करावा. तो बंद करीत असल्याचे सक्षम पुरावे द्यावेत अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली होती आणि त्याला इराणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्यामुळे अमेरिकेने इजराइल ला सोबत घेऊन इराणवर हल्ले सुरू केले होते. (general public) त्याला तितक्याच जोरदारपणे इराणने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर युद्ध भडकले. आणि हळू हळू त्याच्या झळा भारतासह पश्चिम आशियाई देशांना बसू लागल्या. अनेक देशांच्या ऊर्जा सुरक्षेला धक्के बसू लागले. इंधन महागले. प्रचंड प्रमाणावर महागाई वाढली. टंचाई निर्माण झाली. त्याचे प्रतिकूल परिणाम इतर देशांवर जसे झाले तसेच ते अमेरिका आणि इजराइल वर सुद्धा झाली. युद्ध विरोधात सामान्य माणूस रस्त्यावर उतरला. सगळीकडे अस्वस्थ वातावरण तयार झाले.
डोनाल्ड ट्रम्प यांना वाटत होते की युद्ध सुरू झाल्यानंतर आठ दिवसात इराण गुडघे टेकून शरण येईल. पण इराण मागे हटायला तयार नव्हता आणि युद्धबंदीसाठी डोनाल्ड ट्रम्प हे कारणे शोधायला लागले होते. इराण लागी युद्धबंदी हवी होती. अखेर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा खराब झाला. या करारावर डिजिटल सह्या सुद्धा झाल्या. युद्ध बंदीच्या करारामध्ये एकूण 14 मुद्दे आहेत (general public) त्यापैकी बरेचसे मुद्दे इराणसाठी अनुकूल आहेत. इराणवर घालण्यात आलेली बंदी उठवण्याची प्रक्रिया या कराराच्या माध्यमातून सुरू होणार आहे. इराणची जप्त केलेली अब्जावधी रुपयांची संपत्ती खुली करण्यात येणार आहे. इराणचे या युद्धात जे नुकसान झाले त्याची बऱ्यापैकी नुकसान भरपाई दिली जाणार आहे. हर्मोझ सामुद्रधुनी वर इराणचा हक्क मान्य करण्यात आला आहे आणि सर्व देशांसाठी ही सामुद्रधुनी जहाज वाहतुकीसाठी विनामूल्य रिकामी करून देण्याची अट इराणने मान्य केली आहे.
पण ज्या कारणासाठी इजराइल अमेरिका यांनी इराणवर हल्ले सुरू केले होते, (general public) त्यात त्यांना यश मिळाले आहे का? त्यांचा युद्ध करण्यामागचा उद्देश किंवा हेतू पूर्णपणे सफल झाला आहे का? या प्रश्नाची उत्तरे सध्या तरी मिळत नाहीत. समाधानकारक उत्तरे मिळत नसतील तर मात्र या युद्ध स्थितीला अमेरिका आणि इजरायल हे दोघे जबाबदार आहेत असे म्हणता येईल. या दोघांनी पश्चिम आशियातील देशांना संकटात लोटले असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. म्हणजे एका अर्थाने हे दोन देश युद्ध गुन्हेगार आहेत असे म्हणता येईल. इराणवर हल्ला आम्हाला का करावा लागला? हल्ला केला नसता तर पश्चिम आशियातील देश धोक्यात आले असते हे त्यांनी पटवून द्यायला हवे होते किंवा इराणवर हल्ला करण्यापूर्वी पश्चिम आशियाई देशाना विश्वासात घेणे आवश्यक होते. पण तसे न करता इजराइल आणि अमेरिकेने इराण वर हल्ले केले. आता शांतता कराराच्या माध्यमातून युद्धबंदी झाली आहे. पण या युद्धात नेमकं कोण जिंकलं हे युद्ध विश्लेषकांना सुद्धा सांगता येणार नाही.
युद्ध बंदीमुळे पश्चिम आशियाई तसेच अन्य देशांतील टंचाई सदृश्य परिस्थिती संपुष्टात येणार आहे. आता इंधनपुरवठा पूर्ववत सुरळीत होईल. इंधनाचे दर कमी होतील. महागाई कमी होईल. उद्योगधंदे अडचणीतून मुक्त होतील. कोणत्याही समस्येवर युद्ध हा पर्याय होऊ शकत नाही हेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी करार करताना ही युद्धबंदी लेबनॉनसाठी सुद्धा असणार आहे असे म्हटले असले तरी इजराइल नाही आम्ही लेबनॉनवरील हल्ले थांबवणार नाही असा इशारा दिल्यामुळे या कराराला काहीशी विरोधाची किनार आहे. इजरायल मे हा करार स्वीकारल्याशिवाय शंभर टक्के युद्धबंदी होईल असे वाटत नाही.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचे 1500 रुपये बँक खाते करा चेक?