एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ?

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं होतं. (Eknath Shinde) त्यानंतर आता बड्या नेत्यानं एकनाथ शिंदेंबाबत देखील असंच विधान केलं आहे.

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला होता, गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते, सोनिया गांधी यांनी मुंडे यांच्या पक्ष प्रवेशाला हिरवा कंदिल देखील दाखवला होता. परंतु तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामुळे हा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. (Eknath Shinde) दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र त्यांचा प्रवेश होऊ शकला नाही, असं दलवाई यांनी म्हटलं आहे. दरम्यान हुसैन दलवाई यांच्या या वक्तव्यावर अजून एकनाथ शिंदे यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत जो दावा केला आहे, तोही खरा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

गोपीनाथ मुंडे हे भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, सगळं ठरलं होतं. ते सोनिया गांधी यांची भेट घ्यायला निघाले असतानाच त्यांना अहमद पटेल यांचा फोन आला, तुम्ही आधी राजीनामा द्या आणि नंतर निवडून या अशी अट त्यावेळी अहमद पटेल यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर ठेवली, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये येऊ शकले नाहीत. मला वाटतं ही काँग्रेसची सर्वात मोठी चूक होती, असा दावा हुसैन दलवाई यांनी केला आहे.

हुसैन दलवाई यांनी असा दावा केला आहे, की एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र त्यावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं आहे. यावर अजून एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र दलवाई यांच्या या दाव्यानंतर आता चर्चेला उधाण आलं आहे. तर दुसरीकडे महादेव जाणकर यांनी देखील गोपीनाथ मुंडे हे भाजपच्या जाचाला कंटाळले होते, (Eknath Shinde) त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार सुरू होता, असं म्हटलं आहे.

हेही वाचा :

धीरज परदेशीची भगव्या टिळ्यामुळे हत्या का? संग्राम जगताप यांच्या मागण्या काय?

तुम्ही नालायक गृहमंत्री राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण अमित शहांवर संतापले?

कोल्हापुरातील आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांचे निधन?