5 लाख रुपयांना 5 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर एफडी की म्युच्युअल फंड ? यात जास्त नफा कोणत्या योजनेत असतो हे पाहूयात…

आजच्या काळात पैसे कमावणेच पुरेसे नाही तर आपला पैसा योग्य जागी गुंतवणे देखील गरजेचे आहे. प्रत्येकाला वाटते की त्याची बचत काळाबरोबर वाढावी. (Mutual Fund) जेव्हा गुंतवणूक करण्याची वेळ येते तेव्हा भारतात सर्वात आधी दोन पर्याय पुढे येतात. फिक्स्ड डिपॉझिट आणि म्युच्युअल फंड. मात्र गुंतवणूकदाराला चिंता असते की एफडी सुरक्षित की म्युच्युअल फंड ? जर तुमच्याकडे पाच लाखाची रक्कम आहे. आणि तुम्ही तिला पाच वर्षांसाठी गुंतवू इच्छीता तर हे जाणून घेणे महत्वाचे आहे की सर्वात जास्त फायदा कुठे मिळेल ?
भारतीय कुटुंबात गुंतवणूकीचा सर्वात पारंपारिक प्रकार बँकेची एफडी असतो. कारण यात सुरक्षा महत्वाचा मुद्दा असतो. गुंतवणूकीवर भले परतावा कमी मिळत असेल पण पैसे सुरक्षित राहाणे महत्वाचे असते. (Mutual Fund) त्यामुळे फिक्स्ड डिपॉझिट तुमच्या साठी चांगला पर्याय आहे. शेअर बाजारात होणाऱ्या चढ-उताराचा एफडीवर काहीही परिणाम होत नाही. जर तुम्ही ५ लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकले तर ६.५ टक्के वार्षिक व्याज मिळत असेल तर ५ वर्षानंतर तुम्हाला १,९०,२१० रुपये केवळ व्याज म्हणून मिळते. या प्रकारे मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुमची एकूण रक्कम वाढून ६,९०,२१० रुपये होते. ही त्या गुंतवणूकदारांसाठी एकदम अचूक असते ज्यांना कोणत्याही तणावाशिवाय निश्चित नफा हवा असतो.
दुसरीकडे जर तुम्ही थोडी जोखीम घेऊ इच्छीत असाल तर म्युच्युअल फंड एक शानदार पर्याया साबित होऊ शकतो. म्युच्युअल फंडाचा पैसा शेअर बाजारातील चढ उतारावर अवलंबून असतो. (Mutual Fund)यामुळे यात दीर्घकाळात कपाऊंडिंग ( चक्रवाढ ) चा जबरदस्त फायदा असतो. समजा तुम्ही पाच लाख चांगल्या म्युच्युअल फंडात पाच वर्षांसाठी गुंतवले तर यात १२ टक्के वार्षिक रिटर्न मिळते. तर तुमची अंदाजित कमाई सुमारे ३,८१, १७० रुपये होते. म्हणजे पाच वर्षांनंतर तुमच्या पाच लाखाची किंमत वाढून ८,८१,१७० रुपये होऊ शकते. मात्र, हे देखील ध्यानात घ्यायला हवे की म्युच्युअल फंडाचा परताव्याची कोणतीही लिखित गॅरंटी नसते. बाजारातील चढ – उतारावर ही रक्कम मिळण्याचे निश्चित होते.
येथे तक्ता पाहा –
वर्ष एफडीची एकूण व्हॅल्यू ( 6.5 टक्के ) म्युच्युअल फंडाची एकूण व्हॅल्यू ( 12 टक्के ) दोघांमधील फरक ( MF चा अतिरिक्त फायदा )
पहिले वर्ष 5,33,338 रुपये 5,60,000 रुपये 26,662 रुपये
दुसरे वर्ष 5,68,893 रुपये 6,27,200 रुपये 58,307 रुपये
तिसरे वर्ष 6,06,819 रुपये 7,02,464 रुपये 95,645 रुपये
चौथे वर्ष 6,47,273 रुपये 7,86,760 रुपये 1,39,487 रुपये
पाचवे वर्ष 6,90,210 रुपये 8,81,170 1,90,960 रुपये
आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तुम्हाला गुंतवणूक करायला हवी का. आर्थित तज्ज्ञांच्या मते कोणत्याही ठिकाणी पैसे लावणे ही तुमची आर्थिक गरज, गुंतवणूकीचा कालावधी तसेच जोखीम उचलण्याच्या क्षमतेचे आकलन करायला हवे. आकडे स्पष्ट सांगतात की म्युच्यु्अल फंड एफडीच्या तुलनेत परतावा अनेक पठीने जास्त आहे.परंतू यात रिस्क देखील आहे. जर तुम्ही तुमच्या पैशांवर रिस्क घेऊ शकत नाही तर एफडीचा पर्याय स्वीकारा. तर तुमचा हेतू महागाईवर मात करुन संपत्ती तयार करण्याचा असेल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी योग्य आहे.
हेही वाचा :
धीरज परदेशीची भगव्या टिळ्यामुळे हत्या का? संग्राम जगताप यांच्या मागण्या काय?
तुम्ही नालायक गृहमंत्री राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण अमित शहांवर संतापले?