भाजप प्रवक्त्यांना पगार मिळतो का? आधी राजीनामा दिला, आता नेत्याने सिक्रेट सांगितलं?

भाजप पक्ष सोडल्यानंतर शहजाद पुनावाला यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी आता नोकरी करणार असल्याचे सांगितले.

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यावरून शहजाद पुनावाला यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचा राजीनामा देऊन शहजाद यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. (BJP) तसेच भाजप प्रवक्त्याला कोणताही पगार मिळत नसतो. व्यक्ती स्वेच्छेने पद सांभळत असतो. मी राजीनाम्यावर ठाम असून आता कोणताही निर्णय बदलणार नाही, असेही शहजाद यांनी स्पष्ट केले. शहजाद पुनावाला यांनी 30 जुलै रोजी राजीनामा भाजप पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे सोपवला होता.

मीडिया रिपोर्टनुसार, शहजाद पुनावाला यांनी सांगितलं की, मी 2024 साली पक्ष सोडण्याची योजना आखली होती. माझं वैयक्तिक काम आणि राजकीय पक्षासाठी काम करताना आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. (BJP) त्यामळे पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे’. मी 2024 सालापासून राजकारणातून बाहेर पडण्याची योजना आखत आहे. मी आधी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होतो. या नोकरीतून पगार मिळत होता. परंतु मी नोकरी सोडली. मी राजकारणात वेळ देण्यास सुरुवात केली. परंतु पुन्हा नोकरी करायची आहे. राजकारणाऐवजी आता मी नोकरी करण्याचा पर्याय निवडला आहे, असे त्यांनी सांगितले.

‘मी राजीनामा दिल्यानंतर पक्षाने संपर्क साधला. परंतु पक्षाने निर्णयावर पुन्हा विचार करण्यास सांगितले. परंतु मी पुन्हा राजकारणात जायला तयार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. पक्षाच्या पगार मिळत नाही. हे पद स्वेच्छेने स्वीकारावे लागते, असेही पुनावाला यांनी सांगितले. शहजाद यांनी पुढे सांगितले की, ‘भाजपने कधीही माझं मत मांडताना रोखलं नाही. भाजपमध्येच मत मांडण्याचे स्वातंत्र्य मिळते. एखादी कोणती गोष्टी असल्यास भाजप (BJP) नेते बोलावून चर्चा करायचे. मी आता थेट भाजपसाठी काम करणार नाही. परंतु पक्षाच्या विचारधारेचं समर्थन कायम करणार आहे. तरुण, मध्यम वर्गीयांना राजकारणात काम करण्यासाठी भाजप चांगला पर्याय आहे, असेही शहजाद पुनावाला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा :

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ?

 सूर्य स्वराशीत करणार प्रवेश, मेष-मकरसह या ५ राशींचे भाग्य उजळणार?

सांगली जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम?