रस्ते आहेत तर अपघात होणारच, भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे भयंकर वक्तव्य?

बावधन पोलिसांनी ट्रकचा कोणताही थेट धक्का लागलेला नसतानाही केवळ ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे, (accidents) ज्यामुळे चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्याचा प्रकार घडल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असतानाच आता आमदार शंकर मांडेकर यांच्या वक्तव्याने भर पडली आहे.

भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी भयंकर वक्तव्य केले आहे. रस्ते आहेत तर अपघात होणारच असे निष्ठूरपणे आमदार शंकर मांडेकर यांनी म्हटले आहे.पुणे महापालिका हद्दीतील म्हाळुंगे-नांदे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात रिषभ पाटोळे या चिमुकल्याचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. (accidents) त्यावर पत्रकारांनी याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल केला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी हे चिड आणणारे वक्तव्य केले आहे.

पुणे महापालिका हद्दी म्हाळुंगे – नांदे रस्त्यावर खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात रिषभ पाटोळे या चिमुकल्याचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात ट्रकचा कोणताही थेट धक्का लागलेला नसतानाही केवळ ट्रक चालकावरच बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्याचा प्रकार घडला आहे. रस्त्याची चाळण करणाऱ्या जबाबदार अधिकारी आणि यंत्रणांवर कोणतीही कारवाई न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दरम्यान, घटनेनंतर स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना संतप्त नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. त्यांनी याप्रकरणात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले. रोड आहेत तर अपघात होणार आहे. ज्याची मोठी गाडी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो असे असंवेदनशील वक्तव्य आमदार शंकर मांडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले. (accidents) त्यावेळी त्यांनी पत्रकाराला एकेरी भाषेत तु पत्रकार आहे तर मी जबाबदार आमदार आहे असेही म्हटले.

हेही वाचा :

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ?

 सूर्य स्वराशीत करणार प्रवेश, मेष-मकरसह या ५ राशींचे भाग्य उजळणार?

सांगली जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम?