कापसाच्या दरात अनाकलनीय वाढ, वस्त्रोद्योग अडचणीत?

सांगली केंद्र शासनाने कापूस आयातीवर शुल्क माफी दिली असतानाही कापसाचे दरात अनाकलनिय वाढ झाल्याने वस्त्रोद्योग अडचणीत आले आहेत. (cotton) याबाबत शासनाने हस्तक्षेप करून ही दरवाढ रोखावी अशी मागणी विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी केली आहे. कापसाचे दर सध्या ७० हजार रूपये प्रतिखंडी या विक्रमी पातळीवर पोहचले आहेत.

श्री.तारळेकर यांनी सांगितले, यंदाच्या हंगामात कापसाचा क्लोजींग साठा मागील वर्षीपेक्षा ६८ टक्के जादा अर्थात तब्बल ९३ लाख गांठीपेक्षा जास्त राहील असे ऑल इंडिया कॉटन असोसिएशनच्या अहवालात म्हटले आहे. केंद्र शासनाने आक्टोंबर २६ पर्यंत कॉटन आयातीवरचे शुल्क माफ केले असल्याने मागील वर्षाच्या ४१ लाख गांठीच्या आयातीच्या तुलनेत या वर्षात विक्रमी तब्बल ६३ लाख गांठी आयात होत असल्याचा अहवाल प्रदर्शित झाला आहे.तर आक्टोंबर २६ पासुन नविन कापूस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याच्या पारर्श्वभुमीवर देशांतर्गत कापसाचे दर कमी होणे किंवा किमान स्थिर राहणे अपेक्षीत असताना गेल्या काही दिवसांत ५६ हजार रुपये खंडी असलेला कापूस ७० हजार रुपये खंडी या विक्रमी दरपातळीवर पोहचला आहे.

एका बाजुला मागणीपेक्षा अतिरीक्त साठा, अतिरीक्त आयात व नव्या पीकाची चाहुल असताना कापूस दरामध्ये होत असलेली ही एकतर्फी दरवाढ सर्वांनाच गोंधळात पाडणारी व अडचणीची ठरली आहे. (cotton) देशात असलेला सर्व कापुस साठा काही मोठ्या व्यापारी वर्गाने संगनमताने गोदामात बंद करुन कृत्रीम टंचाई निर्माण करुन ही दरवाढ केली जात नाही ना असा संशय वस्त्र साखळीत व्यक्त केला जात आहे.

एका बाजुला राजस्थानमधील रंगप्रक्रिया उद्योग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधाने गेल्या दोन महिण्यापासुन बंद पडल्याने साध्या यंत्रमागासमोर निर्माण झालेला गंभीर प्रश्न, कापडाचा प्रचंड साठा तर दुसर्‍या बाजुला स्वयंचलित यंत्रमागासमोरची विविध संकटे (cotton) यामुळे विटा, इचलकरंजी, मालेगांव, सोलापुर, भिवंडी याठिकाणचे विकेंद्रीत यंत्रमाग अंशत। सुरु असताना व तुलनेने कापूस यार्नची मागणी कमी होत चालली असताना एकतर्फी होत असलेल्या दरवाढीने यंत्रमागापाठोपाठ राज्यातील सुत गिरण्या पण बंद पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे

हेही वाचा :

शरद पवार सत्तेत सामील होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

RBI च्या नव्या नियमांमुळे कर्जदारांना दिलासा मिळणार?

दहा मीटरच काय, दहा इंचही जागा देणार नाही?