अरुणाचलमधील चीनच्या हालचालींवर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान, अखेर ती गोष्ट केलीच मान्य?

अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसखोरी करत असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. (statement) याबाबतचा व्हिडीओ पुढे आला. यावरच आता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मोठे विधान केले. त्यांनी काही गोष्टी देखील मान्य केल्या.

गेल्या काही दिवसांपासून अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसखोरी करत असल्याचा दावा केला जात आहे. 60 किलोमीटरपर्यंत चीनने भारतात घुसखोरी केल्याचेही सांगितले जाते. (statement) त्यातच आता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी भारत चीन सीमेवरबद्दल मोठे विधान केले. त्यांनी मान्य केले आहे की, अरुणाचल प्रदेशातील भारत तणाव आहे. त्यांनी म्हटले की, अरुणाचल प्रदेशाच्या काही गावांतील लोकांना बॉर्डरवर समस्या होत आहेत. पण त्याचे कारण आहे की, सीमेचे योग्य प्रकारे सीमांकन करण्यात आलेले नाही. हा पण त्यांनी हे देखील मान्य 60 किलोमीटरपर्यंत चीनने घुसखोरी केली हे देखील म्हणणे चुकीचे आहे. किरेन रिजिजू हे पश्चिम अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम लोकसभा सीटवरून निवडून आलेत. अरुणाचल प्रदेशाच्या पश्चिममध्ये तवांग, पश्चिम कामेंग, पूर्वी कामेंग, सुबनसिरी या जिल्ह्यांता समावेश आहे. किरेन रिजिजू यांना सीमा वादावर स्पष्ट मत मांडले.

जर कोणी 60 किलोमीटरच्या घुसखोरीबद्दल बोलत असेल तर हे चुकीचे आहे. ज्यामुळे लष्कराचे मनोबल कमी होऊ शकते. भारत चीन यांच्यात अरुणाचल प्रदेशामध्ये मोठी सीमा आहे. त्याला अजून सीमांकन करण्यात आलेले नाही. तिथे सीमेवर बॉर्डर पिलर नाहीत. जमिनीवर बॉर्डर डिफाइन केलेले नाही. सीमेवर समस्या आहे, बॉर्डरजवळील आपल्या गावातील लोकांनी जी चिंता व्यक्त केली, ती अतिशय योग्य आहे.कारण सीमा या सीमांकन करण्यात आलेल्या नाहीत. उंच ठिकाणी गाव नसते. गावखाली असते, घाटीमध्ये असते. मुळात म्हणजे भारत आणि चीन यांच्यात सीमांकन झाले नसल्याने टेन्शन असतेच. भारत आणि चीनच्या वादावर बोलताना त्यांनी म्हटले की, मान्य आहे की, सीमा भागात चीनने रस्ते बनवली आहेत. (statement) त्यांनी हायवे तयार केला, अजून काही सुविधा वाढवल्या जात आहेत.

त्यावेळी भारताने निर्णय घेतला होता की, तिथे रस्ता तयार केला जाणार नाही. काँग्रेसच्या कार्यकाळात संरक्षण मंत्री अँटोनी यांनी संसदेत हे विधान केले होते की, अरुणाचल प्रदेशाच्या सीमा भागात रस्ते तयार करणार नाही. भारत सरकारचा हा निर्णय होता. पण चीनने रस्ते तयार केले. चीनकडून बॉर्डरवर रस्ते तयार केली जात असतील किंवा अगोदर त्यांच्याकडून कब्जा केला जात असेल तर आपणही तसे करू शकतो.पण त्याचा असा अर्थ होत नाही की, ते आपल्या गावावर कब्जा करत आहेत. आपल्या लोकांचे म्हणणे आहे की, आपली जमिन पुढेपर्यंत आहे. जे चायनिज लोक आहेत, सीमा भागातील त्यांचेही म्हणणे आहे की, आमचीही जागा पुढेपर्यंत आहे. भारत अरुणाचल प्रदेशला आपला महत्वाचा हिस्सा मानतो. भारत आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात 1126 किलोमीटर सीमा आहे.

हेही वाचा :

शरद पवार सत्तेत सामील होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

RBI च्या नव्या नियमांमुळे कर्जदारांना दिलासा मिळणार?

दहा मीटरच काय, दहा इंचही जागा देणार नाही?