लिफ्टमधून बाहेर पडताना काळाचा घाला, एका सेकंदात नको ते घडलं भीषण अपघात VIDEO मध्ये कैद?

आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात एका निवासी टॉवरमध्ये रविवारी लिफ्टच्या भीषण अपघातात एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. लिफ्टचे दरवाजे उघडे असतानाच ती अचानक खाली गेल्याने ही महिला त्यात (accident) अडकली आणि गंभीर जखमी झाली. वनिता असं मृत महिलेचं नाव असून, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.वनिता त्यांच्या मुलीसह आणि नातवासह लिफ्टमध्ये प्रवेश करत होत्या. मुलगी आणि नातू लिफ्टमधून सुखरूप बाहेर पडले, मात्र वनिता बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच लिफ्ट अचानक खाली जाऊ लागली. या अनपेक्षित हालचालीमुळे वनिता गोंधळल्या आणि त्यांनी चालत्या लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या लिफ्टमध्येच अडकल्या आणि गंभीर जखमी झाल्या.

अपार्टमेंटमधील रहिवाशांनी आणि इतरांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना बाहेर काढलं. (accident) त्यांना आपत्कालीन उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच बिघडली, त्या बेशुद्ध झाल्या आणि उपचारादरम्यान जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अपार्टमेंट इमारतींमधील लिफ्टची सुरक्षा, देखभाल आणि सुरक्षा यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. लिफ्ट अचानक खाली जाण्यामागचं नेमकं तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, लिफ्टची आवश्यक सुरक्षा तपासणी आणि नियमित देखभाल झाली होती का, की कोणत्याही निष्काळजीपणामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला,(accident) याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

शरद पवार सत्तेत सामील होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

RBI च्या नव्या नियमांमुळे कर्जदारांना दिलासा मिळणार?

दहा मीटरच काय, दहा इंचही जागा देणार नाही?