महाराष्ट्राच्या राजकारणात आजची संध्याकाळ महत्त्वाची ठरणार आहे. महायुतीतील अंतर्गत मतभेद, आगामी राजकीय रणनीती आणि रखडलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. मुंबईतील ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार असून, (political) त्यानंतर महायुतीच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. (political) स्थानिक पातळीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेले मतभेद, विकासकामांच्या श्रेयावरून सुरू असलेला संघर्ष आणि कार्यकर्त्यांमधील समन्वयाचा अभाव यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडींचा महायुतीवर होणारा परिणाम हाही बैठकीतील महत्त्वाचा विषय ठरू शकतो. (political) याशिवाय विविध महामंडळांवरील नियुक्त्या, जिल्हास्तरीय समित्यांचे वाटप आणि विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त जागांबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत एकजूट कायम ठेवण्यासाठी फडणवीस नेत्यांना कोणता संदेश देतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या?
शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद मोंदीच्या मंत्रिमंडळात थेट विधानाने चर्चेला उधाण?
शरद पवारांबरोबरच्या बैठकीत काय घडलं पार्थ पवार काय म्हणाले अखेर बातमी आली समोर?