सांगली जिल्ह्यात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या समस्येविरोधात भय व नशामुक्त अभियान समितीने गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने जनजागृती आणि प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. (Sangli) महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात राबवलेल्या अभियानातून आतापर्यंत सुमारे ३५ ते ४० हजार नागरिकांकडून अर्ज भरून घेण्यात आले असून, हे अर्ज जिल्हा पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांकडे सादर करण्यात आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी ८.३० वाजता सांगलीत “नशामुक्ती निर्धार पदयात्रे”चे आयोजन करण्यात आले आहे. (Sangli) कल्पवृक्ष मैदान, नेमिनाथनगर, विश्रामबाग येथून सुरू होणारी ही पदयात्रा पोलिस मुख्यालयात सांगता होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार आहे.
अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे तरुणांचे भविष्य धोक्यात येत असून अनेक कुटुंबांवर गंभीर परिणाम होत आहेत.(Sangli) त्यामुळे केवळ जनजागृतीपुरता हा विषय मर्यादित न ठेवता अमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि तस्करी करणाऱ्या साखळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृती, व्यसनाधीनांसाठी समुपदेशन व पुनर्वसन, तसेच पोलिस, प्रशासन, आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या समन्वयातून कायमस्वरूपी कृती आराखडा तयार करण्याची गरज समितीने व्यक्त केली आहे. पदयात्रा संपल्यानंतरही ‘नशामुक्त सांगली’ अभियान सातत्याने सुरू राहावे आणि हा प्रश्न केवळ एका दिवसाच्या कार्यक्रमापुरता मर्यादित राहू नये, अशी भूमिका समितीने मांडली आहे.
हेही वाचा :
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या?
शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद मोंदीच्या मंत्रिमंडळात थेट विधानाने चर्चेला उधाण?
शरद पवारांबरोबरच्या बैठकीत काय घडलं पार्थ पवार काय म्हणाले अखेर बातमी आली समोर?