कोल्हापुरातील हातकणंगले धुळोबा रामलिंग देवस्थानाकडे जाणारा रस्ता रात्रीतून जेसीबीने उकरला?

आळते (ता. हातकणंगले) येथील रामलिंग धुळोबा देवस्थानाकडे जाणारा पवार टेकावरील रस्ता अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने उकरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरातील भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, रस्ता कोणी आणि कोणत्या कारणासाठी उकरला, (Kolhapur) याची तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे.

गौण खनिज उत्खननामुळे परिसरातील शेतकरी वैतागले आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीतरी हे टोकाचे पाऊल उचलले आहे का, किंवा मुरूम उत्खननाच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या संघर्षातून हा प्रकार घडला आहे का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकासह विविध भागांतून रामलिंग, आलम प्रभू, धुळोबा आणि कुंथूगिरी या धार्मिक स्थळांना भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. आज रविवार असल्याने रामलिंग धुळोबा देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अशा वेळी देवस्थानाकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता उकरण्यात आल्याने भाविकांची मोठी गैरसोय झाली. रस्ता उकरल्यामुळे चारचाकी आणि दुचाकी वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. (Kolhapur) त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, अनेकांना वाहन रस्त्यावरच थांबवून पुढे पायी जावे लागत आहे. परिणामी देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने रस्ता उकरण्यात आल्याने हा प्रकार नेमका कोणी केला, याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. संबंधितांनी कोणाची परवानगी घेतली होती का? रस्ता उकरण्यामागील नेमके कारण काय? याचा प्रशासनाने तपास करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून होत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले नगरपंचायतीने घटनास्थळी जेसीबी पाठवून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता दुरुस्त केल्याचे सांगण्यात येत आहे. (Kolhapur) त्यामुळे भाविकांची वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली असून, रस्ता उकरण्यामागील कारण आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याची मागणी मात्र कायम आहे.प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी करून या प्रकाराची सखोल चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि भविष्यात देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अशी नासधूस होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचा :

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या?

शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद मोंदीच्या मंत्रिमंडळात थेट विधानाने चर्चेला उधाण?

शरद पवारांबरोबरच्या बैठकीत काय घडलं पार्थ पवार काय म्हणाले अखेर बातमी आली समोर?