कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
गरीब विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात चालवली जात आहे. (food to poor) त्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत, पण पोषण आहार दिला जातो आहे की विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा केली जात आहे असा प्रश्न पडावा अशी स्थिती या योजनेची झाली आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांपेक्षा कंत्राटदारांचेच आर्थिक पोषण केले जात असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.

शालेय पोषण आहार त्या योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या गरीब मुलांना 450 ग्रॅम कॅलरीज आणि 12 ग्रॅम प्रथिन असलेला आहार आणि इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या मुलांना 700 ग्रॅम कॅलरीज आणि 20 ग्रॅम प्रथिन युक्त आहार या योजनेच्या माध्यमातून दिला जातो. अशा प्रकारचा पोषण आहार हा मुला मुलींची शाळेतील टक्केवारी वाढावी या हेतूने दिला जातो, शिवाय त्यांची प्रकृती आरोग्यदायी असावी हे सुद्धा त्यामागे एक प्रमुख कारण आहे. ही योजना उत्तम प्रकारे चालू आहे असे म्हणावे अशी परिस्थिती नाही.
एका विद्यार्थ्यांमागे सात रुपये 65 पैसे इतका खर्च पोषण आहार योजनेतून केला जातो. इतक्या पैशात गेला जाणारा आहार हा प्रकृतीसाठी पोषक आहे असे म्हणणे धाडसाचे नव्हे तर अति धाडसाचे आहे. वडा, भजी, सामोसा, कचोरी, (food to poor) यासाठी किमान 30 रुपये मोजावे लागतात. साध्या एका केळाची किंमत किमान सात रुपये असते. या पार्श्वभूमीवर केवळ सात रुपये 65 पैसे मध्ये कोणता पदार्थ दिला जात असेल याची कल्पनाच केलेली बरी. मराठवाड्यातील एका जिल्ह्याच्या दिव्यांग मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये शासकीय खर्चाने जे भोजन दिले जाते त्याचा दर्जा काय असतो याचा एक व्हिडिओ गेल्याच आठवड्यात व्हायरल झाला होता. तुरुंगामध्ये दिले जाणारे भोजन त्यापेक्षा चांगले असते अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
एका अंगणवाडी मध्ये मुलांना किती निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जातो हे तेथील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधे यांनी एक व्हिडिओ व्हायरल करून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवले होते. माझ्या लेकरांना इतका निकृष्ट पोषण आहार मी कसा काय देऊ असा प्रश्न तिने उपस्थित केला होता. पण याबद्दल तिचे आभार मानन्याऐवजी तिच्यावर निलंबनाची नोटीस बजावण्यात आली. अर्थात अंगणवाडी सेविका महासंघाने निषेध व्यक्त केल्यानंतर ही नोटीस मागे घेण्यात आली. तिच्यावर बजावण्यात आलेली निलंबनाची नोटीस ही तिने व्हायरल केलेल्या व्हिडिओ बद्दल असल्याचा खुलासा मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला मात्र निकृष्ट पोषण आहारावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
पोषण आहारासाठी जे निकष ठरवण्यात आलेले आहेत, त्याप्रमाणे कंत्राटदाराकडून पोषण आहार दिला जात नाही हे वास्तव आहे. एका विद्यार्थ्यांमागे सात रुपये 65 पैसे इतका खर्च पोषण आहार योजनेतून केला जातो. इतक्या पैशात गेला जाणारा आहार हा प्रकृतीसाठी पोषक आहे असे म्हणणे धाडसाचे नव्हे तर अति धाडसाचे आहे. वडा, भजी, सामोसा, कचोरी, (food to poor) यासाठी किमान 30 रुपये मोजावे लागतात. साध्या एका केळाची किंमत किमान सात रुपये असते. या पार्श्वभूमीवर केवळ सात रुपये 65 पैसे मध्ये कोणता पदार्थ दिला जात असेल याची कल्पनाच केलेली बरी. मराठवाड्यातील एका जिल्ह्याच्या दिव्यांग मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये शासकीय खर्चाने जे भोजन दिले जाते त्याचा दर्जा काय असतो याचा एक व्हिडिओ गेल्याच आठवड्यात व्हायरल झाला होता. तुरुंगामध्ये दिले जाणारे भोजन त्यापेक्षा चांगले असते अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
उलट गरीब मुला मुलींच्या आरोग्याविषयी छेडछाड केली जाते आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या पोषण आहार योजनेची झाडाझडती घेतली पाहिजे.शालेय पोषण आहाराबरोबरच शासकीय वसतिगृहामध्ये जे भोजन दिले जाते त्याच्या दर्जा विषयी कधीही चांगले ऐकायला मिळत नाही. तिथे भोजन दिले जाते की थट्टा केली जाते हाच प्रश्न पडावा. अशा निकृष्ट दर्जाच्या भोजनाविषयी विद्यार्थी मग संतप्त होतात. निषेधाची भूमिका घेतात. आणि मग संबंधित यंत्रणा जागृत होते आणि मग काही दिवस विद्यार्थ्यांना चार घास चांगले मिळतात. शालेय पोषण आहार ते वस्तीगृहातील भोजन व्यवस्था याबद्दल विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना आवाज उठवताना दिसत नाहीत.
शहरी आणि ग्रामीण भागातील सामान्य माणसासाठी दररोज किती कॅलरीज चे आणि किमान प्रथिन असलेले भोजन असले पाहिजे याविषयी एका समितीने पन्नास वर्षांपूर्वी शासनाला मार्गदर्शन केले आहे. हे मार्गदर्शन दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबासाठीचे आहे. तर मग बीपीएल रेषेच्या वर असणाऱ्या साठी किती सकस भोजन असले पाहिजे याचा विचार होताना दिसत नाही. एकूणच पोषण आहार ते वसतिगृहातील भोजन या व्यवस्थेमधून कंत्राटदारांचे आर्थिक पोषण होत आहे असे म्हटले तर त्यात वावगे काहीच नाही असे खेदाने म्हणावे लागते.
हेही वाचा :
कोल्हापुरातील हातकणंगले धुळोबा रामलिंग देवस्थानाकडे जाणारा रस्ता रात्रीतून जेसीबीने उकरला?
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची मोठी भेट, ४८ तासांत खात्यात जमा होणार ३००० रुपये?