सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली नवी तारीख दिवशी होणार जाहीर?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ६ सप्टेंबरला होणारी केंद्रीय शिक्षक पात्रता (सीटीईटी) परीक्षा पुढे ढकलली आहे. (Education) यापूर्वी महाराष्ट्रात २८ जूनला होणारी टीईटी परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली. आता सीटीईटी परीक्षा पुढे ढकल्याने सर्व परीक्षार्थींतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

१० जूनअखेर सीटीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेतले होते. सहा सप्टेंबरला परीक्षा होणार होती; परंतु जे पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज भरू शकले नाहीत त्यांना संधी देण्यासाठी २५ ऑगस्ट ते एक सप्टेंबरअखेर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा दिली आहे. परीक्षेची सुधारित तारीख पुन्हा जाहीर केली जाईल, असे आज केंद्रीय शिक्षण मंडळांने पत्रकाद्वारे जाहीर केले. शिक्षक सेवेत कायम राहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी अथवा सीटीईटी परीक्षा सक्तीची केली आहे. तसेच शिक्षक होऊ पाहणाऱ्या उमेदवारांनाही ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षांमधील सततच्या विघ्नांमुळे उमेदवारांमध्ये नैराश्य पसरले आहे.(Education) गेल्या २८ जूनला महाराष्ट्रात टीईटी आयोजित केली होती. मात्र, ऐनवेळी पेपर फुटल्याचे उघडकीस आल्याने ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. दोन महिने झाले, तरी शिक्षण विभागाने अद्याप परीक्षेची नवीन तारीख जाहीर केलेली नाही. या धक्क्यातून उमेदवार सावरत नाहीत तोच सीटीईटी परीक्षाही अचानक पुढे ढकलली आहे.

परीक्षा अगदी तोंडावर आलेली असताना अशा प्रकारे अचानक पेपर फुटणे किंवा तारखा पुढे ढकलल्या जाणे, (Education) यामुळे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सहा महिने अभ्यासाची घेतलेली मेहनत एका झटक्यात वाया जात असल्याने कमालीचे नैराश्य आले आहे. या प्रशासकीय ढिसाळ कारभाराचा थेट फटका केवळ उमेदवारांनाच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्राला बसत आहे. शासनाने या परीक्षा यंत्रणेतील त्रुटी तातडीने दूर करून परीक्षा पारदर्शक व निर्धारित वेळेत घ्याव्यात, अशी मागणी आता उमेदवारांकडून केली जात आहे. टीईटी परीक्षांबाबत अभूतपूर्व गोंधळाची स्थिती आहे. टीईटी हा प्रश्न केवळ शिक्षकांपुरता उरलेला नसून, त्याचा शाळावर, मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत आहे.

हेही वाचा :

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?

नशामुक्त सांगलीसाठी संकल्प करा?