प्रचंड प्रमाणावर वाढलेल्या महागाईच्या विरोधात आवाज उठवणार नसाल तर तुम्हाला महागाईची सवय होईल. हे वक्तव्य आहे नरेंद्र मोदी यांचे, जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. आजचे देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांच्याच काळात सर्वसामान्य जनतेला महागाईची सवय होते आहे.

नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या गुजरात मॉडेलची चर्चा देशभर सुरू होती. (inflation) त्यांची कोल्हापूरच्या सासणे मैदानावर जाहीर सभा होती आणि या सभेमध्ये बोलताना त्यांनी सर्वसामान्य जनतेला “तुम्हाला महागाईची सवय लावून घेण्याची नसेल तर केंद्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारला पराभूत करा”असे आवाहन केले होते. त्यांनी महागाईचा मुद्दा उचलून धरला होता. भारतीय जनता पक्षांनी सुद्धा महागाईच्या विरोधात तेव्हा देशभर निदर्शने केली होती. इसवी सन 2014 पासून देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. “अच्छे दिन आने वाले है”असे स्वप्न दाखवत भाजपाने स्वतः हस्तगत केली होती.आज सर्वसामान्य जनतेसाठी चांगले दिवस आले आहेत असे म्हणण्याचे धाडस कोणीही करणार नाही.
अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात युद्धाचा भडका उडाल्यानंतर इंधनाचे दर जगभर वाढले. भारतालाही या संकटाला सामोरे जावे लागले. इंधन महागले, देशाची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आणि परिणामी महागाईने जबरदस्त उसळी घेतली.खाद्यान्न महागाईचा निर्देशांक झपाट्याने वाढला. आणि ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस उपाय योजना करण्यात नरेंद्र मोदी यांचे सरकार अपयशी ठरले. भारत हा साखर निर्यात करणारा आघाडीवरचा देश होता. आता मात्र साखरेने सरकारला आणि सामान्य जनतेला अडचणीत आणले आहे. गेल्या दीड महिन्यात साखरेच्या प्रति किलो दरात तब्बल 30 रुपयांनी वाढ झाली आहे.
आज बाजारात साखरेचा दर प्रति किलो 75 रुपये ते 80 रुपये या दरम्यान आहे. श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मियांचे सण सुरु होतात. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आणि दीपोत्सव हे तीन मोठे सण एकापाठोपाठ एक येणार आहेत. या सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढते. पण यंदा मात्र साखर उद्योगाच्या इतिहासात साखरेच्या दराने पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर उसळी घेतली आहे.सणासुदीच्या काळात देशात साखरेचा तुटवडा भासू नये म्हणून केंद्र शासनाने यंदा दहा लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. जो देश जगाला साखर पुरवतो (inflation) त्याच देशाला साखर आयात करावी लागते आहे. यंदा साखरेचे उत्पादन घटले आहे. पेट्रोल मधील इथेनॉल चे प्रमाण 20 टक्क्यावर नेण्यात आल्यामुळे साखर उत्पादन घटले. पण त्याला प्रतिकूल हवामान हे सुद्धा कारणभूत ठरले आहे. उसाचे उत्पादन घटले आहे, जागतिक पातळीवर साखर पुरवठा विस्कळीत झालेला आहे.
साखर टंचाई निर्माण होणार असे वातावरण आधीच निर्माण झाल्यामुळे देशातील व्यापाऱ्यांनी साखरेचा साठा करून ठेवला. त्यांनी बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली. परिणामी साखर विक्रीच्या खुल्या बाजारपेठेत साखरेचे दर वाढले. साखर उद्योगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडते आहे. भूसंपादक शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मात्र देशांतर्गत साखरेचा साठा पुरेशा प्रमाणात आहे. साखर आयात करण्याची गरज नाही. मात्र कारखानदार आणि व्यापाऱ्यांना भरपूर नफा मिळावा असे केंद्र शासनाचे धोरण आहे असे म्हटले आहे. देशामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सर्वाधिक साखर उत्पादन केले जाते.
सणासुदीला पुरेल इतका साखरेचा साठा आहे आणि त्यामुळे साखरेचे दर वाढण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. पण प्रत्यक्षात मात्र साखर दराने उसळन घेतली आहे.साखर आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी येणारी साखर कच्चा स्वरूपाची असणार आहे आणि तिचे पक्क्या साखरेत रूपांतर करण्यासाठी वेळ लागणार आहे. (inflation) त्यामुळे आयात साखरेचा दर कमी होण्यासाठी फायदा होईल असे नाही. आणखी दोन महिन्यांनी साखर कारखान्यांचे बॉयलर पेटणार आहेत. नवी साखर येणार आहे. म्हणजे देशात तयार झालेली साखर आणि आयात केलेली साखर एकाच वेळी बाजारात येणार आहे. पण त्याचा फायदा सध्याच्या सणासुदीच्या काळात ग्राहकाला मिळणार नाही हे वास्तव आहे.
हेही वाचा :
तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?