“जी राज्य उत्पादकतेत खूप पुढे होती, ती उत्पादकतेच्या अंतिम सीमेवर पोहोचली आहेत. (potential) मोठ्या प्रमाणात रासायनिक खत वापरामुळे ती क्षमता कमी झाली आहे” असं मुख्यमंत्री म्हणाले.

“नाशिक जिल्हा हा शेतीच्या बाबतीत प्रगतीशील जिल्हा आहे. शेती, फळबागा या क्षेत्रात झालेली प्रगती विलक्षण आहे. इथला शेतकरी अतिशय मेहनती आहे. आदिवासी भागात वेगवेगळ्या प्रकारची वनउपज करणारा आमचा जिल्हा आहे. आज आपण द्राक्षाचा विचार केला, तर देशाच्या द्राक्ष निर्यातीत एकूण 80 टक्के निर्यात नाशिकमधून होते. नाशिकने हे कमावलेलं नाव आहे” (potential) अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या शेतकऱ्याचं कौतुक केलं. दिंडोरीत नूतन कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. “आमच्या माता-भगिनींच्या डोळ्यात माहित नाही पण नाशिकचा कांदा आमच्या डोळ्यात मात्र वर्षातून दोनदा पाणी आणतो. संपूर्ण देशात नाशिकचा कांदा अतिशय प्रसिद्ध आहे. लासलगावसारखं कांद्याचं केंद्र आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
“कांद्याला चांगले भाव असल्याने कोणी कांदे घेऊन आला नाही. वर्षातून एकदातरी कांदे भेट मिळतात. आता कांदे भेट मिळाले असते तर घरी नेले असते. भाव पडतात तेव्हा कांदे भेट मिळतात. निश्चित तो शेतकऱ्यांचा अधिकार आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “शेतमालाचा भाव जेव्हा कमी होतो, तेव्हा होणारं दु:ख, त्याचे परिणाम आम्ही पाहतो. आज सगळ्यात महत्वाचं शेती क्षेत्रात तंत्रज्ञान येणं महत्वाचं आहे” असं फडणवीस म्हणाले. “आपली लोकसंख्या, परिवार वाढले, आपल्या राज्यात 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे. शेतकरी अल्पभूधारक असल्याने शेतकऱ्याची गुंतवणूक क्षमता कमी आहे” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ” AI च्या वापर केला तर उत्पादन खर्च 25 ते 30 टक्के कमी करु शकतो. APP मध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
“शेती क्षेत्रात संशोधन, तंत्रज्ञान येणं गरजेचं आहे. इतक्या सुंदर महाविद्यालयावर माझा विश्वास आहे, पुढच्या काळात शेतीत संशोधन होईल, त्या संशोधनाचं केंद्र हे महाविद्यालय असेल.(potential) त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा मिळेल. शेती क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरु आहे” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या गोष्टी क्षमतेने कशा वापरता येतील. जी राज्य उत्पादकतेत खूप पुढे होती, ती उत्पादकतेच्या अंतिम सीमेवर पोहोचली आहेत. मोठ्या प्रमाणात रासायनिक खत वापरामुळे ती क्षमता कमी झाली आहे” असं मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा :
इचलकरंजीत राजकीय भूकंप प्रकाश आवाडेंची लोकसभा लढण्याची तयारी खासदार माने गटाची धाकधूक वाढली?
महाराष्ट्रात पाऊस कोसळणार की नाही? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज?
८ ते १० तास बैठे काम करताय ? हार्टला का आहे धोका डॉक्टरांनी सांगितले?