मलकापूर एसटी आगाराच्या इमारतीला मध्यरात्री भीषण आग?

शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर एसटी आगाराच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयीन इमारतीला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत संगणक, कॅश मोजण्याचे मशीन तसेच कार्यालयीन साहित्य जळून खाक झाले. (Malkapur) आगीत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयातून धूर व आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आगार प्रशासनाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मलकापूर अग्निशमन पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.(Malkapur) त्यामुळे आग इमारतीच्या अन्य भागात पसरण्यापासून रोखण्यात यश आले.या आगीत कार्यालयातील संगणक संच, कॅश मोजणी मशीन, विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे व अन्य साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक पाहणीत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, प्रत्यक्ष पंचनामा व तपासणीनंतर नुकसानीची निश्चित रक्कम स्पष्ट होणार आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. (Malkapur) मध्यरात्री आग लागल्याने मोठी दुर्घटना टळली असली, तरी आगाराच्या महत्त्वाच्या कार्यालयीन साहित्याचे नुकसान झाल्याने एसटी प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत राजकीय भूकंप प्रकाश आवाडेंची लोकसभा लढण्याची तयारी खासदार माने गटाची धाकधूक वाढली?

महाराष्ट्रात पाऊस कोसळणार की नाही? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज?

८ ते १० तास बैठे काम करताय ? हार्टला का आहे धोका डॉक्टरांनी सांगितले?