सप्टेंबर महिना मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरणार, साखर, दूधनंतर आता प्रवासही महागणार?

मुंबईकरांसाठी सप्टेंबर महिना हा अतिशय चिंता देणार ठरणार आहे. कारण आता महागाईचा डबल धक्का मुंबईकरांना बसणार आहे.

सप्टेंबर महिना सुरू होताच मुंबईकरांच्या खिशाला मोठी कात्री बसणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना महागाईचा डबल झटका बसणार आहे. एका बाजूला अत्यंत आवश्यक घटक असलेल्या दुधाचे दर वाढणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रवास खर्चातही वाढ होणार आहे. रोजच्या वापरातील दुधाच्या दरासोबतच मुंबईतील दैनंदिन प्रवासाचा खर्चही वाढणार आहे. एकूण लोकांच्या बजेटवर मोठा परिणाम पडणार आहे.

इंधनाचे (सीएनजी) दर आणि वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढत असल्याने ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय आता होत आहे. सुरुवातीच्या किमान भाड्यात 1 ते 2 रुपयांची वाढ झाली आहे तर त्यानंतरच्या प्रति किलोमीटर दरामध्येही सुधारणा करण्यात आली आहे. (September) यामुळे ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.

दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या किमती आणि पशुखाद्याच्या वाढत्या खर्चामुळे दूधाचे दर वाढवले आहेत. मुंबई दूध उत्पादक संघटनेने दुधाच्या घाऊक दरात वाढ करायचे ठरवले आहे. त्यानुसार दुधाचा सध्याचा घाऊक दर प्रति लिटर 93 रुपयांवरून 102 रुपयांपर्यंत म्हणजेच थेट 9 रुपये वाढणार आहे. पशुखाद्य, पेंड आणि इतर खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमतींमुळे दूध उत्पादकांवर मोठा आर्थिक भर पडत आहे. (September) यामुळे वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता दुधाचा दर प्रति लिटर 9 रुपयांनी वाढवला आहे.

संघटनेचे अध्यक्ष चंद्रकुमार सिंह यांनी सांगितले की, हे नवीन दर मुंबईत 1 सप्टेंबर 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 पर्यंतच लागू राहणार आहे. जोगेश्वरी येथील दिवाण सेंटर हॉलमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय या निर्णयावर सिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या किमतींबरोबरच धान्य, हळद आणि हरभरा यांसारख्या पशुखाद्याच्या वस्तूंच्या दरातही 25 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हा निर्णयही या बैठकीत घेतला गेला.

या दुहेरी दरवाढीमुळे सामान्य मुंबईकराच्या कुटुंबाच्या महिन्याच्या खर्चात तब्बल 500 ते 800 रुपयांपर्यंतची अतिरिक्त वाढ होईल अशी चिन्हे दिसत आहेत. दररोज 2 लिटर दूध लागणाऱ्या कुटुंबाचा महिन्याचा दूध खर्च 120 ते 150 रुपयांनी वाढण्याची शक्यत आहे. (September) तसेच दररोज रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा महिन्याचा प्रवास खर्च 300 ते 500 रुपयांनी वाढू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा :

इचलकरंजीत राजकीय भूकंप प्रकाश आवाडेंची लोकसभा लढण्याची तयारी खासदार माने गटाची धाकधूक वाढली?

महाराष्ट्रात पाऊस कोसळणार की नाही? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज?

८ ते १० तास बैठे काम करताय ? हार्टला का आहे धोका डॉक्टरांनी सांगितले?