इचलकरंजी परिसरातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. दूध पिताना ठसका लागल्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण झालेल्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. रिवा विकी कांबळे, रा. गावभाग, चंदूर, ता. हातकणंगले असं या चिमुकलीचं नाव आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. (Ichalkaranji) गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात अशा प्रकारे चिमुकल्याचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना असल्याची माहिती समोर आली आहे.

आयजीएम रुग्णालयाने दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्रात रिवाला दूध पिताना ठसका लागल्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच श्वासनलिका दबल्याने तिचा मृत्यू झाल्याची नोंद प्रमाणपत्रात करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी रिवाला ताप आला होता. (Ichalkaranji) त्यामुळे कुटुंबीयांनी तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तापावरील औषधं देऊन तिला घरी पाठवलं होतं. यानंतर बुधवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास रिवाचे वडील विकी कांबळे यांनी तिला डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊन आयजीएम रुग्णालयात नेलं. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून औषधं देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबीय तिला पुन्हा घरी घेऊन आले.
मात्र, बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक रिवाची प्रकृती बिघडली. परिस्थिती गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तिच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. मात्र, रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. आपल्या चिमुकलीला डोळ्यांदेखत गमावल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. उपचार सुरू असताना आईने “माझ्या लेकीला वाचवा…” अशी आर्त हाक देत रुग्णालयात हंबरडा फोडला. लेकीला कुशीत घेऊन आईने केलेला आक्रोश उपस्थितांच्याही काळजाचा ठाव घेणारा ठरला. अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीचा (Ichalkaranji) अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीत राजकीय भूकंप प्रकाश आवाडेंची लोकसभा लढण्याची तयारी खासदार माने गटाची धाकधूक वाढली?
महाराष्ट्रात पाऊस कोसळणार की नाही? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज?
८ ते १० तास बैठे काम करताय ? हार्टला का आहे धोका डॉक्टरांनी सांगितले?