सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंग करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. (ordered) येत्या १ सप्टेंबरपासून ऑनलाइन ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या डिलिव्हरी खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मोठी कंपनी Delhivery ने डायरेक्ट-टू-कंज्यूमर म्हणजेच D2C ब्रँड्ससाठी शिपिंग शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या वाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर होईलच असं नाही, मात्र कंपन्यांचा वाढलेला लॉजिस्टिक्स खर्च पुढे उत्पादनांच्या किमती किंवा डिलिव्हरी शुल्काच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो.

कंपनीने ग्राहकांना पाठवलेल्या ई-मेलनुसार लॉजिस्टिक्स क्षेत्रातील विविध खर्च सातत्याने वाढत आहेत. विमान इंधनाच्या किमती, ग्राउंड स्टाफचा खर्च आणि संपूर्ण लॉजिस्टिक्स नेटवर्कवर वाढलेला महागाईचा दबाव यामुळे शिपिंग शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नव्या दरांनुसार एक्सप्रेस शिपमेंटसाठी प्रत्येक पार्सलमागे ४ रुपये, तर सरफेस शिपमेंटसाठी २ रुपये अतिरिक्त शुल्क आकारलं जाण्याची शक्यता आहे. (ordered) याशिवाय ५०० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या पार्सलसाठी डिलिव्हरी खर्चात सुमारे ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. हे अतिरिक्त शुल्क सध्याच्या Delhivery शिपिंग फीवर लागू होणार आहे. पार्सलचं वजन, डिलिव्हरीचं अंतर आणि शिपमेंटचा प्रकार यानुसार अंतिम खर्च निश्चित केला जातो.या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम D2C कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे. D2C म्हणजे अशा कंपन्या ज्या पारंपरिक घाऊक विक्रेते, वितरक किंवा रिटेल स्टोअरचा आधार न घेता आपली उत्पादनं थेट ग्राहकांना विकतात. ऑनलाइन माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवण्यासाठी या कंपन्या लॉजिस्टिक्स सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
Mamaearth, boAt आणि Wakefit यांसारख्या कंपन्या D2C व्यवसाय मॉडेलशी संबंधित आहेत. (ordered) त्यामुळे शिपिंग खर्च वाढल्यास त्यांच्या ऑर्डरच्या लॉजिस्टिक्स खर्चावर परिणाम होऊ शकतो. कंपन्या हा अतिरिक्त खर्च स्वतः सहन करणार की तो उत्पादनाच्या किमतीत किंवा ग्राहकांकडून आकारल्या जाणाऱ्या डिलिव्हरी शुल्कात समाविष्ट केला जाणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदीला मोठी मागणी असते. अशा वेळी डिलिव्हरी खर्चातील वाढीमुळे ई-कॉमर्स कंपन्या आणि ग्राहक दोघांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनी पुढील काळात उत्पादनाची किंमत पाहतानाच डिलिव्हरी आणि इतर अतिरिक्त शुल्कांचाही विचार करणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन् राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट?
सप्टेंबर महिना मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरणार, साखर, दूधनंतर आता प्रवासही महागणार?
एकामागून एक महाआपत्ती नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?