देशभरातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २४व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या हप्त्यापोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार आहेत.

मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप २४वा हप्ता नेमक्या कोणत्या दिवशी वितरित केला जाणार, याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. (farmers) त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा एखाद्या ठराविक दिवशी हप्ता जमा होणार असल्याचे सोशल मीडियावरील दावे अधिकृत माहितीशिवाय खरे मानू नयेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. प्रत्येक हप्त्यात २ हजार रुपये मिळतात आणि साधारण चार महिन्यांच्या अंतराने हे हप्ते वितरित केले जातात.
२४वा हप्ता खात्यात जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या योजनेशी संबंधित माहिती व्यवस्थित तपासून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम ई-केवायसी पूर्ण आहे की नाही, हे पाहावं. ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण नसल्यास लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. (farmers) त्याचबरोबर बँक खात्याचा क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती अचूक आहे की नाही, याची खात्री करणं गरजेचं आहे.आधारशी संबंधित माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करून घेणंही महत्त्वाचं आहे. याशिवाय जमिनीच्या नोंदी आणि त्यामध्ये असलेली संबंधित माहिती योग्य आहे का, हे शेतकऱ्यांनी तपासून घ्यावं. योजनेचा मागील २३वा हप्ता आपल्या खात्यात जमा झाला आहे की नाही, हेही एकदा खात्री करून घ्यावं.
शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही आणि Beneficiary Status सक्रिय आहे का, हे तपासणं आवश्यक आहे. या तपशीलांमध्ये काही समस्या असल्यास हप्ता अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे २४व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर होण्यापूर्वीच आवश्यक कागदपत्रे आणि माहिती अद्ययावत करून ठेवणं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं. (farmers) दरम्यान, २४व्या हप्त्याची नेमकी तारीख केंद्र सरकारकडून अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार हे स्पष्ट होईल. त्यामुळे सोशल मीडियावरील अप्रमाणित तारखांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा :
अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन् राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट?
सप्टेंबर महिना मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरणार, साखर, दूधनंतर आता प्रवासही महागणार?
एकामागून एक महाआपत्ती नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?