कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे अधून मधून अशी काही वक्तव्ये करत असतात की त्याची मग किमान पंधरा दिवस तरी भारतीय समाजकारणात आणि राजकारणात चर्चा होत असते. भारतात मुस्लिम नकोत अशी मानसिकता असणारा हिंदू होऊ शकत नाही असे वक्तव्य त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे हिंदू समुदायासमोर बोलताना केले आहे आणि आता त्यांच्या या वक्तव्यावर काही राजकीय पक्षांकडून टीका केली जाऊ लागली आहे.

डॉ. मोहन भागवत यांचा अमेरिका दौरा सुरू होण्यापूर्वीच चांगलाच गाजला होता. न्यूयॉर्क शहराचे महापौर ममदानी तसेच 50 पेक्षा अधिक मुस्लिम संघटनांनी तसेच तथाकथित अमेरिका स्थित विद्वानांनी डॉक्टर मोहन भागवत गो बॅक अर्थात अमेरिकेत त्यांना व्याख्यान देण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी केली होती. भारतात काही राजकीय पक्षांनी विशेषतः काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले आहे. आर एस एस ही संघटना मनुस्मृतीचे समर्थन करते, ती जातीयवादी आहे, धर्म कलह निर्माण करते असे या पक्षांचे म्हणणे आहे. या सततच्या टीकेमुळे आरएसएस ही संघटना देशात आणि परदेशात कायम चर्चेत असते. आणि (Dr. Mohan Bhagwat) म्हणूनच अमेरिकेतील महापौरांसह अनेक संघटनांनी डॉक्टर भागवत यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यांना येथे व्याख्यान करण्यास मनाई करावी अशी मागणीही करण्यात आली होती.
न्यूयॉर्क येथील हिंदू समुदायासमोर डॉक्टर भागवत यांचे व्याख्यान झाले. त्याला बिगर हिंदू धर्मीय सुद्धा उपस्थित होते. “जर भारतातील हिंदूंना किंवा एखाद्या हिंदूला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो किंवा ते हिंदू नाहीतच.”हे त्यांचे वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे.वास्तविक इतर कोणत्याही इस्लामिक देशांमध्ये जेवढे मुस्लिम नाहीत तेवढे मुस्लिम भारतामध्ये आहेत. आणि त्यांच्या पूर्वजांना फाळणीच्या वेळी पाकिस्तानात जाण्यासाठी संधी असताना ते गेलेले नाहीत. (Dr. Mohan Bhagwat) याचा अर्थ भारतीय संस्कृतीमध्ये मुस्लिम बांधव रुळलेले आहेत. आणि ते इथे सुरक्षित आहेत असा होतो.स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसापासून भारत आणि पाक यांच्यात सर्व पातळीवरचा दुरावा आहे.
या दोन देशात अनेक युद्धे झालेली आहेत आणि ती भारताने निर्विवादपणे जिंकलेली आहेत. पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी कारवाया सातत्याने होत असतात. त्यामध्ये निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान हे भारताचे शत्रू राष्ट्र आहे असे भारतात मानले जाते. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच असो किंवा आणखी काही असो, मुस्लिम समाजातील काही समाजकंटक धार्मिक कलह वाढावा या उद्देशाने मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक वगैरे महानगरात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असतात दहशतवादी संघटनांना मदत करणारे स्लीपर सेल अनेक महानगरामध्ये आढळून आले आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणजे “पाकिस्तान चे गोडवे गाणाऱ्या मंडळींनी भारतातून पाकिस्तानात जावे”अशा प्रतिक्रिया उमटत असतात याचा अर्थ असा नाही की इथल्या सर्व मुस्लिमांनी देश सोडून जावे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा म्हणजे भारतीय जनता पक्ष होय. (Dr. Mohan Bhagwat) तसेच हिंदू हिताचा विचार करणारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, किंवा अन्य कोणतेही संघटन हे हिंदुत्ववादी या विचारधारेवर आधारित आहे. निवडणूक काळात हिंदुत्व केंद्रस्थानी ठेवून प्रचार केला जातो. या काळात हिंदू मतांचा ध्रुवीकरण केलं जातं. हे डॉक्टर मोहन भागवत यांना माहीत नाही असे म्हणणे धाडसाचे होईल.मुळातच या देशातील मुस्लिमांनी पाकिस्तानात जावे, अशी सार्वत्रिक भावना कालही नव्हती आजही नाही आणि उद्याही नसेल. हे माहीत असूनही डॉक्टर भागवत यांनी न्यूयॉर्कमध्ये हा मुद्दा का घेतला हे कळत नाही. आता भाजपने निवडणूक काळात काँग्रेसला उद्देशून तुष्टीकरणाचा मुद्दा घेऊ नये. कारण असा तुष्टीकरणाचा आरोप आता त्यांच्यावरही होऊ शकतो.
हेही वाचा :
CNG दर वाढल्याने ऑटोचालकांचा ९ सप्टेंबरला संपाचा इशारा, केली मोठी मागणी?
राजकारणात खळबळ बडा नेता देणार राजीनामा तारीखही केली जाहीर?
एअरपोर्टवर अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेट १० मिनिटांच्या चर्चेने राजकीय चर्चांना उधाण?