नाशिक सध्या अघोरी पूजा आणि बुवाबाबांनी बदनाम झाले आहे. आता त्यात टीसीएस कंपनीतील ब्लॅक मॅजिकची भर पडली आहे. धर्मांतरण आणि महिलांचे लैंगिक शोषण यामुळे टीसीएस कंपनी हिंदुत्ववाद्यांच्या अजेंड्यावर आली आहे. त्यात आता काळ्या जादूची भर पडली आहे.

टीसीएस कंपनीला केवळ एकाच धर्मियांना दिलेली सवलत चांगलीच महागात पडली. कंपनी देशभरात बदनाम झाली. या आयटी कंपनीत धर्मांतरण आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचा भांडफोड झाल्यावर संतापाची लाट उसळली. तर या प्रकरणात काळी जादू वापरल्याचाही आरोप होत असल्याने नाशिकच्या बुवाबाजीत अजून भर पडली आहे. आरोपी दानिश शेख याचा मोबाईल अनलॉक झाला आहे. त्याने मोबाईलमधील प्रत्येक ॲप्लिकेशन आणि फाईला स्वतंत्र पासवर्ड ठेवले होते. तसेच त्याला फेस आयडीचे सुरक्षा कवच लावले होते. त्यामुळे फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीत अडचण येत होती. न्यायालयाच्या विशेष परवानगीने आरोपीला फॉरेन्सिक लॅबमध्ये नेण्यात आले. त्यात फेस आयडीचा वापर करून मोबाईल अनलॉक करण्यात आला.
मी थांबणार नाही, कुणाच्याही… संजय निरुपम यांचेही थेट आव्हान; कुणाकडे रोख
मोबाईल अनलॉक झाल्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने डेटा काढला. पुढील तपास सुरू केला. धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात मुंबई पोलिसांचीही एंट्री झाली आहे. न्यायालयाकडून ट्रान्झिट वॉरंट मिळवून चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा सर्व आरोपी 30 ते 38 वयोगटातील आहेत.
ताब्यात घेतलेल्या चार ही आरोपींवर जबरदस्ती धर्मांतरण, मादक पदार्थ देऊन महिलांना जाळ्यात ओढणे, महिलांचे लैंगिक शोषण करणे असे आरोप करण्यात आले आहेत. तर आरोपी इतर धर्मियांवर सातत्याने दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे. हिंदू देवी-देवतांवर ते अश्लाघ्य भाषेत टीका करत होते. तर अश्लील पासवर्ड त्यांनी ठेवले होते. कंपनीच्या बैठकीवेळी आणि व्हॉट्सअपवरही आरोपी कंपनीतील महिला कर्मचार्यांना उद्देशून अश्लील कमेंट, शेरेबाजी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणाचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी धागेदोरे असल्याचे समोर येत आहे. तर अजमेरचा कोणी मौलानाचे ही कनेक्शन असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा
आप पक्षाला मोठा धक्का राघव चड्ढासह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश
ऐकायला कमी येतंय, आहारात या पदार्थांचा समावेश करा दिसून येईल फरक
27 एप्रिलला सर्वात दुर्मिळ योग, 3 लकी राशींचं नशीब फळफळणार, पैशांचा पाऊस पडणार?