पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या सुविधांची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरे गेले होते. (facilities) त्यावेळी अमित ठाकरेंनी छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या बाजूला असलेला पंतप्रधान मोदींचा फोटो काढायला लावला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे सोमवारी पुण्यात एका कॉलेजमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवायला लावला. त्यांची ही कृती भाजपला अजिबात आवडली नाही. भाजपकडून अमित ठाकरेंवर टीका सुरु आहे. काल मुंबईत माहिम परिसरात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अमित ठाकरेंविरोधात आंदोलन केलं. (facilities) यावेळी मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दादरमध्ये काही वेळासाठी वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. अमित ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याचा भाजपं युवा मोर्चाचा हा निर्णय भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना अजिबात पटला नाही. त्यांनी महाराष्ट्र भाजपं युवा मोर्चाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
अमित ठाकरेंबद्दल बोलताना रविंद्र चव्हाण यांनी जे शब्द वापरले, त्यामुळे राज ठाकरे यांना नक्कीच राग येईल. ‘काल आलेला पोरगा काही तरी बोलतो आणि आपण त्या विरोधात आंदोलन करतो हे चुकीचे आहे’ असं रवींद्र चव्हाण म्हणाले. अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांनी नापसंती व्यक्त केली. “मला युवशक्तीला अडचणीत आणायचे नाही, आम्हाला युवकांना शिक्षित करायचे आहे. गुंड म्हणून तयार करायचे नाही” असं रवींद्र चव्हाण म्हणाले. मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर व्यासपीठावरून चव्हाणांनी युवा मोर्चाला सुनावलं.
काल भाजपं युवा मोर्चाकडून माहिममध्ये अमित ठाकरेंविरोधात आंदोलन होणार असल्याचं समजल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसे कार्यकर्ते जमले होते. (facilities) त्यांनी भाजपला ओपन चॅलेंज केलं. “मी संदीपला देशपांडेला भेटायला आलो आहे. हे जमलेले लोकं आहेत. बोलावलेले जमले तर शिवाजी पार्क कमी पडेल. भाजपं युवा मोर्चाला वाटत असेल शिवतीर्थ पर्यंत यावं तर त्यांचं वेलकम आहे” असं अविनाश जाधव म्हणाले.
पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या सुविधांची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरे गेले होते. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. ठाकरे यांनी कँटिनमध्ये मिळणारे जेवण आणि खेळाडूंना प्रशिक्षक मिळत नाही, त्यावरुन कॉलेजच्या अधीक्षक, मुख्याध्यापकांना जाब विचारला. यावेळी एका विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो असल्याचे सांगितले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मोदींचा फोटो काढायला लावला.
हेही वाचा :
ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण?
राज्य मंत्रिमंडळात 4 सर्वात मोठे निर्णय, शेतकऱ्यांनाही मोठी खुशखबर मिळाली?
ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर?