पाकिस्तानने भारताकडे मागितली भीक,भारताचे थेट उत्तर, चीन आणि रशिया दोघेही?

सिंधु जल करार भारताने स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचा मोठा थयथयाट बघायला मिळतोय. (hesitation) त्यातच आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शंघाई सहयोग संघटनेच्या शिखर संमेलनात हा मुद्दा उपस्थित केला. मात्र, त्यांनाच धक्का बसला.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सिंधु जल करार भारताने स्थगित केल्याचा मुद्दा जागतिक व्यासपीठावर उपस्थित केला. चीनचे अध्यक्ष जिनपिंग फक्त ऐकत राहिले आणि पाकिस्तान पाण्यासाठी धडपडत होता. पाणी या क्षेत्रात जीवन असल्याचेही त्यांनी म्हटले. भारताने पहलगामवरील हल्ल्यानंतर सिंधु जल करार स्थगित केला. (hesitation) त्यानंतर पाण्यासाठी पाकिस्तानचा थयथयाट बघायला मिळाला. भारताने आपली भूमिका स्पष्ट केली की, बेकायदेशीर संघटनेला नवी दिल्लीच्या निर्णयाविरोधात बोलण्याचा अधिकार नाही. डॉन पेपरच्या रिपोर्टनुसार, किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये शंघाई सहयोग संघटनेचे शिखर संमेलन आहे. यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी म्हटले की, स्थायी शांतीशिवाय पूर्ण ताकद मिळणे शक्य नाही.

सिंधु जल कराराचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी म्हटले की, पाणी आमच्या परिसरातील जीवन आहे. लाखो लोकांचे जीवन आहे. पाणी आमच्या जमिनींना शेतीसाठी योग्य बनवते. आमच्या येणाऱ्या पिढ्यांचे जीवन सुरक्षित बनवते. कधीच एखादे शस्त्र म्हणून याचा उपयोग केला नाही पाहिजे. हेच नाही तर या मुद्द्यावरून कोणी दबावही टाकला नाही पाहिजे. एप्रिल महिन्यात झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधु जल करार स्थगित करत पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी रोखले होते.

हा एक जागतिक मुद्दा आहे, इथे कोणाचीही मर्जी चालणार नाही. याचे पालन केलेच पाहिजे, असेही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटले. यादरम्यान त्यांनी दहशतवादावर बोलतानाही म्हटले की, सर्वात मोठा गंभीर विषय तो बनला आहे, तो आमच्या काही क्षेत्रात आहे. (hesitation) यादरम्यान इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तानने केलेल्या प्रयत्नांबद्दलही बोलताना शरीफ दिसले. ज्यावेळी शरीफ हे बोलत होते, त्यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन बघत होते.

सिंधु जल करारावरील स्थगिती उठवण्यासाठी पाकिस्तानने जागतिक न्यायालयात देखील धाव घेतली. पण भारताकडून त्यांना कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद दिला जात नाहीये. जागतिक मंचावरही पाकिस्तान वारंवार हा मुद्दा उपस्थित करत आहे. मात्र, त्यालाही भारताकडून दाद दिली जात नाही. भारताने पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी अडवल्याने पाकिस्तानच्या काही क्षेत्रात स्थिती गंभीर असल्याचे बघायला मिळतंय.

हेही वाचा :

ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण?

राज्य मंत्रिमंडळात 4 सर्वात मोठे निर्णय, शेतकऱ्यांनाही मोठी खुशखबर मिळाली?

ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर?