आम्ही आरक्षण सोडण्यास तयार, फक्त मोदी सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान?

आम्ही आरक्षण सोडण्यास तयार असल्याचे मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी केलं. रामदास आठवले यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

देशातील आरक्षण हटवण्याची मागणी काही संघटनाकडून केली जात आहे. देशातील काही संघटनांनी जंतर-मंतरवर आंदोल केलं. (reservation) त्यामुळे आरक्षण हटवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावर मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी मोठं भाष्य केलं आहे. तसेच आरक्षण सोडण्यासाठी एक अट देखील ठेवली आहे. ही अट पूर्ण केल्यानंतर आरक्षण सोडण्यास तयार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय रामदास आठवले हे छत्तीसगडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आरक्षणावर मोठं भाष्य केलं. आठवलेंनी म्हटलं की, भारतात जातीवर आधारित आरक्षणाची तरतूद आहे. जोपर्यंत जातीयवाद राहील, तोपर्यंत आरक्षण कायम राहील, असा दावा त्यांनी आधी केला होता. त्यानंतर आता रांचीमध्ये म्हटलं की, जाती व्यवस्था संपुष्टात आली, तर आम्ही आरक्षण सोडण्यास तयार आहे’. तर जातीवर आधारित आरक्षणाच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन झालं. (reservation) यावेळी पोलिसांनी 50 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. गरिब विद्यार्थ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आंदोलकांची मागणी होती. सोशल मीडियावरही आरक्षण हटवण्याची मागणी काही तरुणांकडून केली जात आहे.

आरक्षणाच्या मुद्यावरून मंगळवारी मोठ्या संख्येने अनुसूचित जाती आणि ओबीसी तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. संविधान बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारने 65 टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली. बिहारमध्ये सध्या आरक्षण 50 टक्क्यांवर आहे. 2024 साली पटनामध्ये 65 टक्के आरक्षण घटनाबाह्य घोषित करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारने आरक्षणाची मर्यादा ही 65 टक्के केली होती. 2022-23 च्या जाती आधारित सर्व्हेच्या रिपोर्टवर आधावर निर्णय घेण्यात आला होता. (reservation) परंतु या आरक्षणाला पाटणा हायकोर्टाने ब्रेक लावला होता. हायकोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवला होता.काही दिवसांपूर्वी जंतर-मंतरवर आरक्षणाच्या सुधारणा आणण्यासाठी आंदोलन झालं होतं. या आंदोलनातील प्रमुख नेत्यांची भेट ही केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी घेतली होती. यां आंदोलनात हर्ष दुबे, मृत्यूजंय पाठक, रण बहादूर सिंह चौहान यांनी सहभाग दर्शवला होता. त्यांच्यासोबत लवकरच केंद्रीय मंत्र्‍याने आणखी एक बैठक करू असं आश्वासन दिलं होतं.

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?

एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का अधिकारात केली मोठी कपात?

कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर,पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले?