व्हॉट्सॲप आता केवळ गप्पा मारण्याचे साधन राहिले नसून ते तुमचे डिजिटल वॉलेटदेखील बनले आहे. व्हॉट्सॲप पे (WhatsApp) आणि विविध सेवा प्रदात्यांच्या मदतीने तुम्ही आता घरबसल्या, कोणाशीही चॅट करत असताना आपला मोबाईल रिचार्ज करू शकता.

या नवीन सुविधेमुळे तुम्हाला रिचार्जसाठी वेगळ्या (WhatsApp)ॲपवर जाण्याची किंवा दुकानात जाण्याची गरज उरलेली नाही. ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची, याची स्टेप बाय स्टेप माहिती खालीलप्रमाणे आहे
व्हॉट्सॲपवरून मोबाईल रिचार्ज करण्याची सोपी पद्धत
ॲप उघडा: तुमच्या फोनवर (WhatsApp) उघडा.
पेमेंट सेक्शन: उजव्या कोपऱ्यातील तीन ठिपक्यांवर (Settings) क्लिक करून ‘Payments’ निवडा.
रिचार्ज निवडा: तिथे तुम्हाला ‘Mobile Recharge’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
नंबर टाका: ज्या नंबरचा रिचार्ज करायचा आहे तो नंबर टाईप करा किंवा कॉन्टॅक्ट लिस्टमधून निवडा.
प्लॅन निवडा: तुमचा ऑपरेटर (Jio, Airtel किंवा तुमचे जे कोणते सिम सीम असेल ते) निवडून उपलब्ध रिचार्ज प्लॅन्सची यादी पहा आणि योग्य प्लॅन निवडा.
पेमेंट करा: तुमचा UPI पिन टाकून पेमेंट पूर्ण करा. तुमचा रिचार्ज लगच होईल
चॅटबॉटद्वारे रिचार्ज (कंपन्यांच्या अधिकृत नंबरवरून)
भारतातील प्रमुख कंपन्यांनी त्यांचे स्वतःचे चॅटबॉट्स सुरू केले आहेत
वर दिलेला तुमच्या ऑपरेटरचा नंबर सेव्ह करा आणि त्यावर ‘Hi’ किंवा ‘Recharge’ असा मेसेज पाठवा.चॅटमध्ये तुम्हाला रिचार्जचे पर्याय मिळतील.
तुमचा प्लॅन निवडा आणि व्हॉट्सॲप पे किंवा इतर यूपीआय (UPI) माध्यमातून पैसे भरा.
हेही वाचा
आप पक्षाला मोठा धक्का राघव चड्ढासह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश
ऐकायला कमी येतंय, आहारात या पदार्थांचा समावेश करा दिसून येईल फरक
27 एप्रिलला सर्वात दुर्मिळ योग, 3 लकी राशींचं नशीब फळफळणार, पैशांचा पाऊस पडणार?