चर्चेत राहण्यासाठी काय पण!

एखाद्या लोकप्रतिनिधीने किंवा राजकीय नेत्याने त्यानी केलेल्या (bargain) विधायक आणि विकासात्मक कामातून चर्चेत राहिले पाहिजे. पण असे काही जण असतात की, सामाजिक वातावरण प्रदूषित करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे त्यापैकीच एक आहेत असे खेदाने म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी के हयात असताना कितीतरी वर्षे आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक पुस्तक लिहिले होते आणि त्याचे नाव”शिवाजी कोण होता?”असे होते. या पुस्तकाच्या असंख्य आवृत्ती निघाल्या आहेत. या पुस्तकांने वाचकप्रियता मिळवली आहे. छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला असल्याबद्दल यापूर्वी कोणीही आक्षेप घेतलेला नाही. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना कोणीतरी हे पुस्तक भेट म्हणून दिले आहे. पुस्तकाच्या टायटल मध्ये “शिवाजी कोण होता?”असा एकेरी उल्लेख असल्याबद्दल आणि तो खटकल्याबद्दल आमदार गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या प्रशांत आंबी यांना मोबाईलवरून संवाद साधताना जाब विचारला आणि त्यांची जातही विचारली. तू बामन आहेस का? पानसरेंच काय झालं ते तुला माहित नाही काय? अशी भाषा वापरली.

या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल (bargain) झाल्यानंतर परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून आमदार संजय गायकवाड यांचा निषेध होऊ लागला आहे. हे पुस्तक प्रकाशित होऊन अनेक वर्षांचा कालावधी लोटला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीचा नेमका आणि खरा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आपण हे पुस्तक लिहिले आहे असे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी ते हयात असताना स्पष्ट केले होते.या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अनैतिहासिक माहिती दिली गेली असती तर त्याला आज हयात असणाऱ्या इतिहास संशोधकांनी आव्हान दिले असते. पण तसे काही घडलेले नाही.याचा अर्थ शिवप्रेमींनी तसेच इतिहासाच्या अभ्यासकांनी हे पुस्तक स्वीकारलेले आहे असे म्हणता येईल.या पुस्तकाच्या टायटलला हरकत घेणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांनी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी या पुस्तकातील मजकुराबद्दल प्रतिक्रिया देणे अपेक्षित होते.


पानसरेंचं काय झालं माहित नाही काय तुला? तुझी जात कोणती? (bargain) तू बामन आहेस का? हे असे वादग्रस्त वक्तव्य करण्यामागे त्यांचा नेमका हे तू काय होता हे तपासून पाहिले पाहिजे. केवळ चर्चेत राहणे हाच उद्देश असावा असे सकृत दर्शनी तरी वाटते.संजय गायकवाड हे त्यांनी केलेल्या कामाबद्दल चर्चेत आहेत असे म्हणता येणार नाही.(bargain) वादग्रस्त कृती करणे, वादग्रस्त बोलणे हे त्यांच्याकडून यापूर्वी घडलेले आहे. विधानभवनातील कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला त्यांनी केलेली मारहाण अजूनही लोकांच्या लक्षात आहे. अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना शिवीगाळ करणे असेही त्यांच्याकडून यापूर्वी घडलेले आहे. वादग्रस्त कृती मधूनच ते वारंवार चर्चेत येतात. आता चर्चेत येण्यासाठी”शिवाजी कोण होता?”या टायटलला आक्षेप घेतला आहे आणि प्रकाशकाला धमकी दिली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांच्यासह परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांनी आमदार संजय गायकवाड यांचा निषेध केला आहे. आणि तो अनाठाई नाही.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांना ज्येष्ठ विचारवंत म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांचे कर्मभूमी कोल्हापूर. कोल्हापुरात त्यांनी अनेक आंदोलने केली. शेतकऱ्यांना, श्रमिकांना, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी लिहिलेल्या”शिवाजी कोण होता?”या पुस्तकाबद्दल शिवसेनेच्या आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याबद्दलच्या तीव्र प्रतिक्रिया कोल्हापुरातून उमटणे हे स्वाभाविक आहे. आणि झालेही तसेच. नंबर गायकवाड यांचा सर्व थरातून निषेध होतो आहे. शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेऊन आमदार गायकवाड यांना फटकारले पाहिजे.

हेही वाचा

आप पक्षाला मोठा धक्का राघव चड्ढासह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

ऐकायला कमी येतंय, आहारात या पदार्थांचा समावेश करा दिसून येईल फरक

 27 एप्रिलला सर्वात दुर्मिळ योग, 3 लकी राशींचं नशीब फळफळणार, पैशांचा पाऊस पडणार?